आबुधाबी - राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज आबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियममध्ये सामना रंगला आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पण त्याचा हा निर्णय अंगलट आल्याचे दिसून आले.
- ' class='align-text-top noRightClick twitterSection' data=''>
राजस्थानची सलामीवीर जोडी स्टिव्ह स्मिथ आणि जोस बटलर यांनी सावध सुरूवात केली. पण इसुरू उडानाच्या गोलंदाजीवर स्मिथ इनसाइट एजवर बाद झाला. यानंतर पुढच्याच षटकात राजस्थानला जोस बटलरच्या रुपाने मोठा धक्का बसला.
नवदीप सैनीने टाकलेला चेंडू जोस बटलरच्या बॅटची कड घेऊन स्लीपच्या दिशेने गेला. तो झेल स्लीपमध्ये उभ्या असलेल्या देवदत्त पडीक्कलने टिपला. पडीक्कलने चेंडू पकडल्याचा विश्वास बटलरला बसला नाही. तो काही क्षण पाहातच राहिला.
दरम्यान, बटलरने आक्रमक सुरूवात केली होती. त्याने १२ चेंडूत २२ धावा केल्या. यात ३ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. पण, तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.
राजस्थानचा संघ -
जोस बटलर (यष्टीरक्षक), स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, राहुल तेवतिया, रियान पराग, टॉम करन, जोफ्रा आर्चर, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल आणि. जयदेव उनादकट
रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -
अॅरोन फिंच, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स (यष्टीरक्षक), शिवम दुबे, गुरकीरत सिंह, वॉशिंग्टन सुंदर, इसुरू उदाना, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल आणि अॅडम झम्पा
हेही वाचा - ''भाई, केस काळे करून कोणी तरुण होत नाही'', अभिनेत्याची धोनीवर टीका
हेही वाचा - KKR VS DC : दिल्लीविरुद्धच्या सामन्यात केकेआर 'या' स्फोटक फलंदाजाला मैदानात उतरवण्याची शक्यता