ETV Bharat / sports

RCB VS DC : कुशल श्रेयससमोर अनुभवी विराटचे आव्हान; आज चॅलेंजर्संशी कॅपिटल्स भिडणार

आयपीएल २०२० मधील १९ वा सामना आज रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे.

ipl 2020 rcb vs dc : royal challengers bangalore vs delhi capitals match preview
RCB VS DC : कुशल श्रेयससमोर अनुभवी विराटचे आव्हान; आज चॅलेंजर्संशी कॅपिटल्स भिडणार
author img

By

Published : Oct 5, 2020, 6:44 AM IST

दुबई - आयपीएल २०२० मधील १९ वा सामना आज रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे. श्रेयस अय्यरच्या कुशल नेतृत्वासमोर आज अनुभवी विराट कोहलीचे आव्हान असणार आहे. दोन्ही संघानी, सुरू असलेल्या आयपीएलमध्ये आतापर्यंत प्रभावी कामगिरी केली असल्याने आजचा रंगतदार होण्याची शक्यता आहे. उभय संघातील सामन्याला भारतीय वेळेनुसार सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सुरूवात होईल.

आरसीबी आणि दिल्ली हे दोन्ही संघ मजबूत दिसून येत आहेत. दोन्ही संघानी आपापल्या चार सामन्यात तीन-तीन विजय मिळवले आहेत. आजच्या सामन्यात विजय मिळवून आणखी दोन गुणांची कमाई करण्याचे लक्ष्य दोन्ही संघाचे असणार आहे.

दिल्ली संघात युवा खेळाडूंची फौज आहे. यात पृथ्वी शॉ, कर्णधार श्रेयस अय्यर, ऋषभ पंत ही नावे घेता येतील. पृथ्वी शॉ आणि अय्यर सद्या शानदार फॉर्मात आहेत. मार्कस स्टायनिस व शिमरोन हेटमायर यांच्यासारखे आक्रमक फलंदाजी करणारे खेळाडू दिल्ली संघात आहेत. शिवाय अनुभवी शिखर धवनही आहे. गोलंदाजीत नॉर्जे सुरुवातीला व डेथ ओव्हर्समध्ये वेगवान मारा करण्यात यशस्वी ठरलेला आहे. पण कागिसो रबाडाला मागील सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही.

दुसरीकडे मागील सामन्यात विराट कोहलीने शानदार नाबाद अर्धशतक झळकावत आपण फॉर्मात आल्याचे संकेत दिले आहेत. विराटला सूर गवसल्यामुळे एबी डिव्हिलियर्स व शिवम दुबे यांच्यावरील दडपण कमी होईल. आरसीबीतर्फे युवा देवदत्त पडीक्कलने आतापर्यंत सातत्याने चार सामन्यांत तीन अर्धशतकांसह १७४ धावा केल्या आहेत. अ‌ॅरोन फिंचचे अपयश संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. इसुरू उदाना व नवदीप सैनी प्रभावी कामगिरी करण्यात यशस्वी ठरत आहेत. आरसीबीसीसाठी युजवेंद्र चहल हुकमी एक्का ठरलेला आहे. पण, फिरकीपटू झम्पाला आपली छाप अद्याप सोडता आलेली नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -

विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स, पार्थिव पटेल, अ‌ॅरोन फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोइन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, इसुरु उदाना, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंह मान, वाशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे आणि अ‌ॅडम झम्पा.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ -

श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरोन हेटमेयर, कागिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, ऋषभ पंत, इशांत शर्मा, अक्षर पटेल, संदीप लमिछाने, किमो पॉल, डेनियल सॅम्स, मोहित शर्मा, एनरिक नार्जे, अ‌ॅलेक्स कॅरी, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टायनिस आणि ललित यादव.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.