IPL च्या वेळापत्रकात बदल? सलामीचा सामना मुंबई आणि बंगळुरू यांच्यात रंगण्याची शक्यता - आयपीएल २०२०
गव्हर्निंग काऊन्सिलमधील विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सलामीचा सामना मुंबई आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होण्याची शक्यता आहे.
मुंबई - चेन्नई सुपर किंग्ज संघातील २ खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. यामुळे आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात बदल केला जाण्याची शक्यता आहे. सलामीचा सामना मुंबई आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होण्याची शक्यता आहे, असे संकेत मिळत आहेत.
आयपीएलच्या अंतिम फेरीतील दोन संघामध्ये पुढील वर्षाच्या सलामीचा सामना खेळला जातो. मागील वर्षीचे अंतिम फेरीत पोहोचलेले संघ चेन्नई आणि मुंबई हे होते. यंदाच्या १३ व्या हंगामात सलामीचा सामना धोनी आणि रोहितच्या संघात होणार होता. पण सीएसकेचे २ खेळाडू आणि सपोर्ट स्टापमधील १२ जण कोरोनाबाधित झाले. यामुळे बीसीसीआयने अद्याप वेळापत्रकाची घोषणा केलेली नाही. अशात सलामीचा सामना मुंबई विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगण्याचे संकेत मिळत आहेत.
एका इंग्रजी माध्यमाला गव्हर्निंग काऊन्सिलमधील विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 'सलामीच्या सामन्यात कदाचीत बदल केला जाऊ शकतो. सलामीचा सामना खेळण्याची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला संधी मिळू शकते. स्पर्धेचा पहिला सामना असल्यामुळे तुम्हाला स्टार खेळाडू मैदानावर उतरवणे गरजेचे आहे. जर महेंद्रसिंह धोनीचा संघ खेळू शकणार नसेल तर नक्कीच विराटच्या संघाला संधी दिली जायला हवी.
सद्यघडीला गव्हर्निंग काऊन्सिलने आयपीएलच्या अधिकृत वेळापत्रकाची घोषणा केलेली नाही. येत्या काही तासांमध्ये याची घोषणा केली जाऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे. दुसरीकडे सीएसकेच्या बाधित खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आले आहे. याशिवाय खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नईच्या इतर खेळाडूंचा क्वांरटाइन कालावधी वाढवण्यात आला आहे.
हेही वाचा - 'रैनाच्या डोक्यात यश गेलयं; तो ११ कोटी रुपये सोडून गेला'
हेही वाचा - IPL २०२० : 'हे' ३ खेळाडू सुरेश रैनाची जागा घेऊ शकतात; यातील एक आहे आयपीएलचा दिग्गज