अबुधाबी - आयपीएल २०२० मध्ये रविवारी डबल हेडरमध्ये दोन सामने खेळण्यात आले. यात पहिल्या सामन्यात चेन्नईने बंगळुरूवर विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात राजस्थानने बलाढ्य मुंबईवर विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवले. मुंबई इंडियन्सवर मोठा विजय साकारत राजस्थानने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. या विजयानंतर राजस्थानने गुणतालिकेत नेमके कोणते स्थान पटकावले, पाहा...
राजस्थानचची झेप -
चेन्नईने विजय मिळवल्यावर राजस्थानचा संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर घसरला होता. कारण यापूर्वी राजस्थानने ११ सामने खेळली होती. यात त्यांना चार सामन्यांमध्येच विजय मिळवता आला होता. तर सात सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे या सामन्यापूर्वी राजस्थानचा संघ हा आठ गुणांसह आठव्या स्थानावर होता. १२व्या सामन्यात राजस्थानने मुंबईवर विजय मिळवत दोन गुणांची कमाई केली. या दोन गुणांसह राजस्थानच्या संघाने गुणतालिकेत आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.
मुंबई पहिल्या स्थानावर कायम -
मुंबईला पराभवानंतरही काही फरक पडलेला नाही. कारण, यापूर्वी मुंबईच्या संघाने १० सामने खेळले होते. या सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाने ७ विजय मिळवले होते, तर ३ सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. ११व्या सामन्यात मुंबईला राजस्थानकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यापूर्वी मुंबईचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. पण या पराभवानंतरही मुंबईच्या अव्वल स्थानामध्ये कोणताही बदल झालेला नाही. या पराभवानंतरही मुंबई अव्वल स्थानावर कायम आहे.
काय आहे गुणतालिकेची स्थिती -
सध्याच्या घडीला गुणतालिकेत मुंबई पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर दिल्लीचा संघ आहे. तिसऱ्या स्थानी विराटचा बंगळुरू आहे. या तिन्ही संघांचे सध्या १४ गुण आहेत. पण रनरेट चांगला असल्यामुळे मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. चौथ्या स्थानावर कोलकाता आहे. पाचव्या आणि सहाव्या स्थानी अनुक्रमे पंजाब आणि राजस्थान आहे. सातव्या स्थानावर हैदराबाद आहे तर धोनीचा चेन्नई संघ आठव्या स्थानावर आहे.
हेही वाचा -KKR VS KXIP : पंजाबचे सलग पाचव्या विजयाचे लक्ष्य, समोर आहे केकेआर
हेही वाचा - आयपीएलच्या प्ले ऑफ फेरीचे वेळापत्रक जाहीर; दुबईत रंगणार अंतिम सामना