ETV Bharat / sports

IPL २०२० : धोनीचा चेन्नई संघ तळाशी तर, हैदराबादची गुणातालिकेत मोठी झेप - ipl 2020 points table

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. या सामन्यानंतर हैदराबादच्या संघाने गुणातालिकेत मोठी झेप घेतली, तर तीन वेळा अजिंक्यपद पटकवणारा धोनीचा चेन्नई संघ तळाला कायम आहे.

IPL 2020 Points Table: SRH Move To The 4th Spot Following A 7-Run Win Over CSK
IPL २०२० : धोनीचा चेन्नई संघ तळाशी, तर हैदराबादची गुणातालिकेत मोठी झेप
author img

By

Published : Oct 3, 2020, 2:03 PM IST

Updated : Oct 3, 2020, 2:31 PM IST

दुबई - आयपीएल २०२०च्या गुणातालिकेत प्रत्येक सामन्यागणिक मोठे उलटफेर पाहायला मिळत आहेत. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. या सामन्यानंतर हैदराबादच्या संघाने गुणातालिकेत मोठी झेप घेतली तर, तीन वेळा अजिंक्यपद पटकवणारा धोनीचा चेन्नई संघ तळाशीच आहे. चेन्नई आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतर गुणतालिकेमध्ये नेमका काय बदल झाला आहे, पाहा...

IPL 2020 Points Table: SRH Move To The 4th Spot Following A 7-Run Win Over CSK
सनरायजर्स हैदराबादचा संघ...

हैदराबादचा संघाने स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला. आतापर्यंत हैदराबादच्या संघाने चार सामने खेळली आहेत. या चार सामन्यांमध्ये हैदराबादच्या संघाला दोन पराभव मिळाले आहेत, तर त्यांनी दोन विजयही साकारले आहेत. हैदराबादच्या संघाच्या नावावर आता चार गुण जमा झाले आहेत. त्यामुळे हैदराबादचा संघ आता गुणतालिकेत सातव्या क्रमांकावरून थेट चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

दुसरीकडे. चेन्नईचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव ठरला. चेन्नईचा संघ आतापर्यंत चार सामने खेळला आहे आणि त्यांना तीन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ या गुणतालिकेत तळाला, म्हणजेच आठव्या स्थानावर आहे.

सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आहे. चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर हैदराबादचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यानंतर पाचव्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. सहाव्या स्थानावर विराटचा आरसीबी संघ आहे. गुणातालिकेत सातव्या स्थानावर किंग्ज इलेव्हन पंजाब आहे.

IPL २०२० : आज पुन्हा शाहजाहच्या मैदानावर धावांचा पाऊस?, केकेआर-दिल्ली यांच्यात लढत

IPL २०२० : राजस्थानसमोर बंगळुरूचे आव्हान, विराटच्या कामगिरीवर नजरा

Last Updated : Oct 3, 2020, 2:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.