शारजाह - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सोमवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सवर ८२ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर बंगळुरूने गुणतालिकेत झेप घेतली आहे. तर कोलकाची घसरण झाली आहे. बंगळुरू विरुद्ध कोलकाता या सामन्यानंतर गुणतालिकेत नेमके काय बदल झाले, पाहा....
कोलकाताविरुद्धच्या सामन्याआधी बंगळुरूचा संघ चौथ्या स्थानावर होता. त्यांनी सहा सामने खेळले होते. या सहा सामन्यांमध्ये आरसीबीने चार विजय मिळवले होते. त्याचबरोबर त्यांना दोन पराभव पत्करावे लागले होते. पण कोलकाताविरुद्धच्या सामन्यात आरसीबीने केकेआरवर मोठा विजय मिळवला आणि दोन गुणांची कमाई करत तिसरे स्थानही पटकावले.
दुसरीकडे बंगळुरूविरुद्धच्या सामन्याआधी केकेआरचा संघ तिसऱ्या स्थानावर विराजमान होता. केकेआरच्या संघाने सहा सामने खेळले होते. या सहा सामन्यांमध्ये केकेआरने चार विजय मिळवले होते. त्याचबरोबर त्यांना दोन पराभव पत्करावे लागले होते. त्यामुळे या सामन्यापूर्वी केकेआरचा संघ हा ८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता. या सामन्यापूर्वी गुणतालिकेत आरसीबी आणि केकेआर यांचे गुण जरी सारखे असेल तरी नेट रनरेट अधिक असल्यामळे कोलकाता तिसऱ्या तर बंगळुरू चौथ्या स्थानावर होता. पण या सामन्यात केकेआरच्या संघाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे आठ गुणच असून त्यांची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.
दरम्यान, गुणतालिकेत सध्याच्या घडीला मुंबई अव्वल स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्सवर दुसऱ्या स्थानी आहे. आरसीबीने केकेआरचे गुणतालिकेतील तिसरे स्थान पटकावले आहे, तर केकेआरची चौथ्या स्थानावर घसरण झालेली आहे. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर अनुक्रमे हैदराबाद आणि राजस्थानचा संघ आहे. धोनीच्या नेतृत्वात खेळणारा चेन्नईचा संघ सातव्या स्थानावर आहे. तर किंग्ज इलेव्हन पंजाब तळाशी म्हणजे, आठव्या स्थानी आहे.