दुबई - किंग्ज इलेव्हन पंजाबने विजयी चौकार मारला आहे. त्यांनी शनिवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर अखेरच्या षटकात १२ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर पंजाबने गुणतालिकेत बदल केले. पंजाबच्या विजयानंतर गुणतालिकेत नेमका काय बदल झाला, पाहा...
हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाबच्या संघाने १० सामने खेळले होते. यात त्यांनी ४ विजय मिळवले होते, तर त्यांना सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. पण ११व्या सामन्यात पंजाबने विजय मिळवला. या विजयासह पंजाबने दोन गुणांची कमाई केली. यासह पंजाबचे १० गुण झाले आहेत. या १० गुणांसह पंजाबच्या संघाने गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले आहे.
दुसरीकडे पंजाबविरूद्धच्या सामन्याआधी हैदराबादने देखील १० सामने खेळले होते. यात हैदराबादने चार विजय मिळवले होते, तर त्यांना सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. ११ व्या सामन्यात हैदराबादचा पराभव झाला. त्यामुळे आता हैदराबादच्या खात्यामध्ये सात पराभव झाले आहेत. पण त्यांचे या आयपीएलमधील आव्हान अजूनही कायम आहे. सध्याच्या घडीला हैदराबादचा संघ सहाव्या स्थानावर आहे.
दरम्यान, गुणतालिकेत मुंबईचा संघ अव्वलस्थानी विराजमान आहे. तर दुसऱ्या स्थानावर दिल्ली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळुरूचा संघ तिसऱ्या स्थानावर कायम आहे. चौथ्या स्थानावर कोलकाताचा संघ कायम आहे. तर पाचव्या आणि सहाव्या स्थानावर अनुक्रमे पंजाब आणि हैदराबाद आहे. सातव्या स्थानावर राजस्थान असून धोनीचा चेन्नई संघ शेवटी आठव्या स्थानावर आहे.
हेही वाचा - अर्धशतकानंतर राणानं दाखवली 'सुरींदर' नावाची जर्सी...जाणून घ्या कारण
हेही वाचा - KKR vs DC : चक्रवर्ती-कमिन्सच्या माऱ्यासमोर दिल्ली नेस्तनाबूत, कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान कायम