ETV Bharat / sports

IPL Points Table : मुंबई इंडियन्स अव्वल; राजस्थानची मोठी घसरण - ipl points table 2020 NEWS

मुंबई इंडियन्सने मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले.

IPL 2020 points table : mumbai indians team get 1st position in points table after beating rajasthan royals
IPL Points Table : मुंबई इंडियन्स अव्वल; राजस्थानची मोठी घसरण
author img

By

Published : Oct 7, 2020, 7:11 AM IST

दुबई - मुंबई इंडियन्सने मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले. दरम्यान, मुंबई आणि राजस्थान यांच्यातील सामन्यानंतर गुणलातिकेत नेमके काय बदल झाले, पाहा...

मुंबई आणि राजस्थान या सामन्यापूर्वी मुंबईचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होता. दिल्ली कॅपिटल्स अव्वल होते. राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई संघाने पाच सामने खेळलेले होते. यात तीन विजय तर दोन पराभवाचा समावेश होता. राजस्थानविरुद्धचा सामना जिंकल्यावर मुंबईच्या संघाचे ८ गुण झाले. त्याचबरोबर त्यांचा रनरेट चांगला असल्यामुळे त्यांना अव्वलस्थान पटकावता आले. मुंबईने दिल्लीला खाली खेचत अव्वलस्थान पटकावले.

दुसरीकडे राजस्थानचा संघ उभय संघातील सामन्यापूर्वी पाचव्या स्थानावर होता. कारण यापूर्वी झालेल्या चार सामन्यांमध्ये राजस्थानला दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला होता तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण मुंबईविरुद्ध त्यांचा मोठा पराभव झाला आणि त्यांची घसरण झाली. राजस्थान पाचव्या स्थानावरुन सातव्या स्थानावर फेकला गेला आहे.

दरम्यान, मुंबईने ८ गुणांसह नेट रनरेटच्या आधारावर गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले. यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर आरसीबीचा संघ आहे. त्यानंतर गुणतालिकेत चौथे स्थान हे केकेआरच्या संघाने पटकावले आहे. धोनीचा चेन्नई सुपर किंग्जचा संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर राजस्थानचा संघ सातव्या आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हा संघ आठव्या स्थानावर आहे.

हेही वाचा - अफगाणिस्तानच्या सलामीवीराचा मृत्यू; भीषण अपघातानंतर मृत्यूशी झुंज अपयशी

हेही वाचा - MI vs RR : मुंबईची विजयी हॅटट्रिक, बुमराहने टिपले चार बळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.