नवी दिल्ली - आयपीएलच्या ३२व्या सामन्यानंतर लोकेश राहुलने 'ऑरेंज कॅप' स्वत: कडे राखली आहे. तर, 'पर्पल' कॅप दिल्ली कॅपिटल्सच्या कगिसो रबाडाकडे आहे. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला 'पर्पल कॅप' देण्यात येते.
चालू हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. राहुलने ८ सामन्यांत ४४८ धावा केल्या आहेत. या यादीमध्ये दुसर्या क्रमांकावर मयंक अग्रवाल असून त्याच्या खात्यात ३८२ धावा आहे.
तर, 'पर्पल' कॅप दिल्ली कॅपिटल्सच्या कगिसो रबाडाकडे आहे. रबाडाने ८ सामन्यांमध्ये एकूण १८ बळी घेतले आहेत. त्यानंतर या यादीत राजस्थानचा जोफ्रा आर्चर, मुंबई इंडियन्सचे गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा मोहम्मद शमी आहे. या सर्वांनी प्रत्येकी १२ बळी घेतले आहेत.