ETV Bharat / sports

IPL २०२० : केन विल्समसन पुढील सामना खेळणार; वॉर्नरचे संकेत

author img

By

Published : Sep 28, 2020, 2:12 PM IST

केन विल्समसन एक अनुभवी खेळाडू असून त्याला संघात स्थान मिळायला हवे, असे क्रिकेट जाणकारांचे मत आहे. अशात वॉर्नरने विल्समसनला मधल्या फळीत उतरवण्याचे संकेत दिले आहेत.

ipl 2020 : next match warner hints playing kane williamson
IPL २०२० : केन विल्समसन पुढील सामना खेळणार; वॉर्नरचे संकेत

दुबई - आयपीएल २०२०मध्ये सलग दोन पराभवानंतर सनरायझर्स हैदराबाद संघावर टीकेची झोड उठली आहे. तसेच, कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली जात आहे. कारण, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्समसनला वॉर्नरने दोन्ही सामन्यात, संधी दिलेली नव्हती. विल्समसन एक अनुभवी खेळाडू असून त्याला संघात स्थान मिळायला हवे, असे क्रिकेट जाणकारांचे मत आहे. अशात वॉर्नरने विल्समसनला मधल्या फळीत उतरवण्याचे संकेत दिले आहेत.

कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर वॉर्नर म्हणाला की, मधल्या फळीतील फलंदाजांनी संथ फलंदाजी केली. यामुळे आम्हाला अजून 20-30 धावा कमी पडल्या. या धावा झाल्या असत्या तर, सामना अजून रंगतदार झाला असता. आम्हाला मधल्या फळीत सुधारणा करावी लागेल, यासाठी आम्ही उपाययोजना आखत आहोत, असे वॉर्नरने सांगितले.

वॉर्नरने आखलेल्या व्यूहरचनेप्रमाणे पुढील सामन्यात केन विल्यमसनला अंतिम संघात स्थान दिले जाणार असल्याचे समजते. सध्याच्या घडीला सनरायझर्स हैदराबादचा संघ मधल्या फळीमध्ये धावांसाठी झगडत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुढील सामन्यात केन विल्यमसन पुन्हा मैदानात आल्यास संघाची मधली फळी सावरण्याची शक्यता आहे.

सनरायझर्सचा सामना उद्या (ता. २९) दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. या सामन्यात हैदराबादचा संघ कशी कामगिरी करणार हे महत्वाचं ठरणार आहे.

सनराइजर्स हैदराबादचा संघ -

डेव्हिड वार्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, वृद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, अभिषेक शर्मा, बी संदीप, संजय यादव, फॅबियन अ‌ॅलेन, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टानलेक, टी नटराजन आणि बासिल थम्पी.

हेही वाचा - IPL २०२० : गुणातालिकेत राजस्थानची 'रॉयल' उडी, पाहा काय झाले बदल...

हेही वाचा - IPL २०२० : तेवतियाचे एका षटकातील ५ षटकार पाहून युवराज म्हणाला... VIDEO

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.