आबुधाबी - आयपीएल २०२० च्या सलामीच्या सामन्यात अंबाती रायुडूने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला मात दिली. आज रायुडूचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने, मुंबई इंडियन्सने त्याला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई इंडियन्सने ट्विट करत अंबाती रायुडूला शुभेच्छा दिल्या आहेत. यात मुंबईने अंबाती रायुडूचा आपल्या संघाच्या जर्सीमधला फोटो अपलोड करुन त्याला शुभेच्छा दिल्या. रायुडू जेव्हा मुंबईकडून खेळत होता, तेव्हाचा मुंबई इंडियन्सच्या जर्सीतला त्याचा फोटो अपलोड केला आहे. यासोबत मुंबईने मेसेज केला की, 'हॅप्पी बर्थ-डे, अॅम-बॅटिंग रायुडू. मोठी खेळी खेळत रहा. त्याचवेळी मुंबईने कंसात लिहिले की, पण या मोठ्या खेळी आमच्याविरुद्ध करु नकोस.'
-
Happy birthday, Am-batting Rayudu! 🎂
— Mumbai Indians (@mipaltan) September 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Continue to score big runs (but not against us 😋)#OneFamily @RayuduAmbati pic.twitter.com/MO5YBMcrFA
">Happy birthday, Am-batting Rayudu! 🎂
— Mumbai Indians (@mipaltan) September 23, 2020
Continue to score big runs (but not against us 😋)#OneFamily @RayuduAmbati pic.twitter.com/MO5YBMcrFAHappy birthday, Am-batting Rayudu! 🎂
— Mumbai Indians (@mipaltan) September 23, 2020
Continue to score big runs (but not against us 😋)#OneFamily @RayuduAmbati pic.twitter.com/MO5YBMcrFA
दरम्यान, मुंबई इंडियन्सने दिलेल्या हटके शुभेच्छा सर्वांनाच आवडल्या. अनेक नेटिझन्सनी मुंबईच्या ट्वीटनंतर यावर लाईक्स आणि ट्वीट्सचा पाऊस पाडला. रायुडूने वयाची ३५ वर्षे पूर्ण केली आहे. त्याने मुंबईविरुद्ध पहिले दोन विकेट झटपट गेल्यानंतर संयमी खेळी केली. त्याने कोणताही धोका न पत्करताना खेळपट्टीचा चांगल्याप्रकारे अंदाज घेतला. जम बसल्यावर मात्र त्याने चौफेर फटकेबाजी करत जबरदस्त खेळी करत अर्धशतक झळकावले. त्याने ४८ चेंडूत ७१ धावांची खेळी करत चेन्नईच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
हेही वाचा - एकीकडे आयपीएल, तर दुसरीकडे 'कॉस्ट कटिंग', वाचा नक्की प्रकरण काय
हेही वाचा - IPL २०२० : सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का; स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर, 'या' खेळाडूला संधी