मुंबई - आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघाने जर्सी बदलली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सने आपली नवी जर्सी, चाहत्यांसमोर आणली. मुंबईची जर्सी काही प्रमाणात मागील वर्षासारखीच गडद निळ्या रंगाची आहे. खांद्यावर आणि कमरेवर गोल्डन रंगाच्या पट्ट्या नव्या जर्सीवर पाहायला मिळत आहेत.
मुंबई इंडियन्स संघाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट करत नवी जर्सी रिलीज केली. या पोस्टमध्ये एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात एक व्यक्ती नव्या जर्सीसह डान्स करताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सच्या, 'दुनिया हिला देंगे हम' हे गाणे बॅकग्राऊंडला ऐकावयास मिळत आहे. या जर्सीचे प्री-ऑर्डर ऑनलाईनवर सुरू करण्यात आले आहे.
-
👕 BLUE. ✨GOLD. 👊🏻AALA RE!!!
— Mumbai Indians (@mipaltan) August 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
😍 The wait is over. Paltan, here’s our official jersey for #Dream11IPL! 💙
Pre-order on: https://t.co/14Jd096jBN#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @hydroman_333 @thesouledstore pic.twitter.com/4eKZYWjQPV
">👕 BLUE. ✨GOLD. 👊🏻AALA RE!!!
— Mumbai Indians (@mipaltan) August 30, 2020
😍 The wait is over. Paltan, here’s our official jersey for #Dream11IPL! 💙
Pre-order on: https://t.co/14Jd096jBN#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @hydroman_333 @thesouledstore pic.twitter.com/4eKZYWjQPV👕 BLUE. ✨GOLD. 👊🏻AALA RE!!!
— Mumbai Indians (@mipaltan) August 30, 2020
😍 The wait is over. Paltan, here’s our official jersey for #Dream11IPL! 💙
Pre-order on: https://t.co/14Jd096jBN#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @hydroman_333 @thesouledstore pic.twitter.com/4eKZYWjQPV
आयपीएल २०२० ची सुरूवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. देशातील कोरोनाचा वाढलेल्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. सर्व संघ स्पर्धेसाठी युएईमध्ये दाखल झाले आहेत. अशात चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडू आणि स्टाप कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय चेन्नई सुपर किंग्जचा महत्वाचा खेळाडू सुरेश रैनाने व्यक्तिगत कारण देत स्पर्धेतून माघार घेतली आहे. पण कोरोनाच्या भीतीनेच रैनाने स्पर्धेतून माघार घेतल्याची चर्चा आहे.
चेन्नईचे खेळाडू आणि स्टाप कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलची शेड्यूल प्रक्रिया थांबवली आहे. कारण बीसीसीआयने २४ तासांत आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे शेड्यूलची घोषणा केली जाईल, असे सांगितले होते. पण अद्याप यांची घोषणा करण्यात आलेली नाही.
हेही वाचा - ''तू खरा लढवय्या आहेस'', सीएसकेच्या कोरोनाग्रस्त खेळाडूला बहिणीकडून धीर
हेही वाचा - विराट 'या' तारखेला होणार बाबा... जोफ्रा आर्चरचे ५ वर्षांपूर्वीचे ट्विट व्हायरल!