अबूधाबी - आयपीएलचा थरार १९ सप्टेंबरपासून रंगणार आहे. स्पर्धेसाठी सर्व संघ युएईमध्ये दाखल झाले असून खेळाडू सराव सत्रात भरपूर मेहनत घेत आहेत. अशात मुंबई इंडियन्सचा संघ समुद्र किनाऱ्यावर धमाल करताना पाहायला मिळाला. अनेक खेळाडू त्यांच्या पत्नी आणि मुलांसह दिसून आले.
-
▶️ Press play for wholesome #OneFamily moments ☀️🌊#MumbaiIndians #MI #Dream11IPL pic.twitter.com/DdwPTUnm3W
— Mumbai Indians (@mipaltan) September 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">▶️ Press play for wholesome #OneFamily moments ☀️🌊#MumbaiIndians #MI #Dream11IPL pic.twitter.com/DdwPTUnm3W
— Mumbai Indians (@mipaltan) September 8, 2020▶️ Press play for wholesome #OneFamily moments ☀️🌊#MumbaiIndians #MI #Dream11IPL pic.twitter.com/DdwPTUnm3W
— Mumbai Indians (@mipaltan) September 8, 2020
युएईमध्ये सद्याच्या घडीला उष्ण वातावरण असून पारा ४० डिग्रीपर्यंत पोहोचत आहे. यामुळे खेळाडूंना दिवसा सराव करणे शक्य होत नाही. पण दुपारच्या काळात जर खेळाडूंना एकत्र आणायचे असेल तर काय करता येईल, याचा आढावाही काही संघांनी घेतला आहे. त्यानुसारच मुंबईचा संघ हा समुद्रकिनारी फिरायला गेल्याचे पाहायला मिळाले. यावेळी संघातील खेळाडूंनी फुटबॉलचाही आस्वाद लुटला.
-
The sea-sun of Blue & Gold 🌊☀️💙#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @surya_14kumar @dhawal_kulkarni pic.twitter.com/PB40m3DUAd
— Mumbai Indians (@mipaltan) September 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The sea-sun of Blue & Gold 🌊☀️💙#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @surya_14kumar @dhawal_kulkarni pic.twitter.com/PB40m3DUAd
— Mumbai Indians (@mipaltan) September 8, 2020The sea-sun of Blue & Gold 🌊☀️💙#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @surya_14kumar @dhawal_kulkarni pic.twitter.com/PB40m3DUAd
— Mumbai Indians (@mipaltan) September 8, 2020
मुंबई इंडियन्समधील काही खेळाडू आपल्या कुटुंबीयांना घेऊन युएईमध्ये दाखल झाले आहेत. यात रोहित तिची पत्नी रितिका सचदेव आणि मुलगी समायराचासोबत पोहोचला आहे. बीचवर अनेक खेळाडू पत्नी आणि मुलांसह मस्ती करताना दिसून आले.
-
#OneFamily time at the beach 🏖️💙#MumbaiIndians #MI #Dream11IPL @adu97 @dhawal_kulkarni @surya_14kumar @ImRo45 @ritssajdeh pic.twitter.com/UHdsx3kgav
— Mumbai Indians (@mipaltan) September 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#OneFamily time at the beach 🏖️💙#MumbaiIndians #MI #Dream11IPL @adu97 @dhawal_kulkarni @surya_14kumar @ImRo45 @ritssajdeh pic.twitter.com/UHdsx3kgav
— Mumbai Indians (@mipaltan) September 8, 2020#OneFamily time at the beach 🏖️💙#MumbaiIndians #MI #Dream11IPL @adu97 @dhawal_kulkarni @surya_14kumar @ImRo45 @ritssajdeh pic.twitter.com/UHdsx3kgav
— Mumbai Indians (@mipaltan) September 8, 2020
दरम्यान, आयपीएलचा १३ वा हंगाम ५३ दिवसांचा आहे. नव्या वेळापत्रकानुसार २४ सामने दुबई, २० सामने अबूधाबी आणि १२ सामने शारजाहमध्ये खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेतील सायंकाळचे सामने भारतीय वेळेनुसार, ७ वाजून ३० मिनिटांनी सुरू होतील, तर डबल हेडरचे १० सामने दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरू होतील. बीसीसीआयने साखळी सामन्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा - IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी सलामीचा सामना धोक्याचा; पाहा आकडेवारी
हेही वाचा - ''मला त्याला नेटमध्येही गोलंदाजी करायची नाही'', आंद्रे रसेलला घाबरला मराठमोळा क्रिकेटपटू