ETV Bharat / sports

IPL २०२० : ...म्हणून धोनी मुंबईविरुद्धच्या सामन्यात खालच्या फळीत फलंदाजीस आला

धोनी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात खालच्या फळीत फलंदाजीसाठी उतरला. कारण मैदानात डावा-उजवा हे कॉम्बिनेशन कायम रहावे, यासाठी संघाने रणनिती आखली होती. त्या रणनितीचा भाग म्हणून धोनी वरच्या फळीत फलंदाजीसाठी आला नाही. त्याने पहिले जडेजा त्यानंतर करन ला पाठवले. याशिवाय धोनीला पाठदुखीचा त्रास होत होता, असे समजते. कारण धोनी फलंदाजीला येण्यापूर्वी फिजिओ त्याच्या पाठीवर औषधाचा स्प्रे मारताना दिसून आले.

author img

By

Published : Sep 20, 2020, 10:25 AM IST

ipl 2020 : ms dhoni comeback late batting due to planning and back problem against mumbai indians
IPL २०२० : ...म्हणून धोनी मुंबईविरुद्धच्या सामन्यात खालच्या फळीत फलंदाजीस आला

आबुधाबी - आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरूवात झाली आहे. सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने, गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ५ गडी राखून पराभव करत आपणच सलामीच्या सामन्याचे 'किंग्ज' असल्याचे दाखवून दिले. या सामन्यात सर्वांची नजर होती, ती महेंद्रसिंह धोनीवर. कारण धोनी या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानात परतणार होता. पण तो मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात फलंदाजीसाठी खालच्या फळीत उतरला. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आता धोनीच्या या निर्णयाचे कारण समोर आले आहे.

रविंद्र जडेजा बाद झाल्यानंतर धोनी फलंदाजीसाठी मैदानात येईल, अशी सर्वांची आपेक्षा होती. पण धोनीने इंग्लंडचा २२ वर्षीय खेळाडू सॅम करनला फलंदाजीसाठी पाठवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. डावा-उजवा हे कॉम्बिनेशन कायम रहावे, यासाठी संघाने रणनिती आखली होती. त्या रणनितीचा भाग म्हणून धोनी वरच्या फळीत फलंदाजीसाठी आला नाही. त्याने पहिले जडेजा त्यानंतर करनला पाठवले. याशिवाय धोनीला पाठदुखीचा त्रास होत होता, असे समजते. कारण धोनी फलंदाजीला येण्यापूर्वी फिजिओ त्याच्या पाठीवर औषधाचा स्प्रे मारताना दिसून आले.

दरम्यान, सॅम करन बाद झाल्यानंतर अखेर धोनी तब्बल ४३७ दिवसांनी फलंदाजीसाठी आला. १९ व्या षटकात हुक करणाच्या प्रयत्नात असलेल्या चेंडूवर बुमराहने अपिल केले. तेव्हा पंचांनी धोनीला बाद दिले. यावर धोनीने डीआरएस घेऊन पंचाला आपला निर्णय मागे घेण्यास भाग पाडले. शेवटच्या षटकात डू प्लेसिसने चौकार आणि एक धाव काढत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. धोनी शून्य धावावर नाबाद माघारी परतला.

प्रथम फलंदाजी करताना मुंबईने दिलेल्या १६२ धावांचे लक्ष्य पार करताना खराब सुरुवात होऊनही चेन्नईने विजयश्री खेचून आणला. ६ धावांवर २ बाद अशी स्थिती असताना फाफ डू प्लेसिस आणि अंबाती रायडू यांनी डाव सावरला. फाफ डू प्लेसिसने ४४ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी केली. तर अंबाती रायडूनेही शानदार ७१ धावांची खेळी केली. त्याने ३ षटकार आणि ६ चौकार लगावले. या दोघांनी केलेल्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे पहिल्याच सामन्यात चेन्नईने मुंबईला मात दिली.

IPL २०२० : मुंबई इंडियन्ससाठी 'हे' खेळाडू ठरले खलनायक, वाचा कोण आहेत ते...

IPL २०२० : डु-प्लेसिसची कमाल; सीमारेषेवर हवेत सूर घेत टिपले २ झेल, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.