ETV Bharat / sports

MI vs CSK : मुंबईकडून चेन्नईचे 'पानिपत' - चेन्नई स्कॉड टुडे

चेन्नईच्या ११५ धावांचे आव्हान मुंबईने १० गडी राखून आणि १२.२ षटकांतच पूर्ण केले. सलामीवीर इशान किशनने ६ चौकार आणि ५ षटकारांसह ६८ तर, क्विंटन डी कॉकने ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४६ धावा कुटल्या.

ipl 2020 mi vs csk match live
MI vs CSK LIVE
author img

By

Published : Oct 23, 2020, 6:54 PM IST

Updated : Oct 23, 2020, 10:31 PM IST

शारजाह - आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचे 'पानिपत' करत लीगच्या पहिल्या पराभवाचा वचपा काढला. चेन्नईच्या ११५ धावांचे आव्हान मुंबईने १० गडी राखून आणि १२.२ षटकांतच पूर्ण केले. सलामीवीर इशान किशनने ६ चौकार आणि ५ षटकारांसह ६८ तर, क्विंटन डी कॉकने ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४६ धावा कुटल्या. रोहित शर्माची तब्येत ठीक नसल्याने त्याच्याऐवजी सौरभ तिवारीला संघात स्थान देण्यात आले होते. तर, कायरन पोलार्डकडे मुंबईचे नेतृत्त्व सोपवण्यात आले होते.

ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह या मुंबईच्या वेगवान गोलंदाजांच्या तोफखान्यासमोर चेन्नईचा अनुभवी बुरुज पूर्णपणे नेस्तनाभूत झाला. नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारलेल्या मुंबईने चेन्नईला २० षटकात ११४ धावांवर रोखले. रोहित शर्माच्या बदली नेतृत्वाची संधी मिळालेल्या कायरन पोलार्डने अचूक डावपेच आखत चेन्नईच्या फलंदाजांवर वर्चस्व राखले. चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस, तर मधल्या फळीतील फलंदाज अंबाटी रायुडू, एन जगदीशन, महेंद्रसिंह धोनी, आणि रवींद्र जडेजा आजच्या सामन्यात सपशेल अपयशी ठरले. ७१ धावांवर ८ गडी बाद झाले असताना युवा अष्टपैलू खेळाडू सॅम करनने संघाची कमान आपल्या हाती घेतली. दुसऱ्या बाजूची पडझड होताना त्याने संयमी अर्धशतक झळकावले. शेवटच्या षटकात बोल्टने त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. करनने ४ चौकार आणि २ षटकारांसह ५२ धावा केल्या. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने ४ षटकात १८ धावा देत ४ मोहरे टिपले. तर बुमराह आणि राहुल चहरला प्रत्येकी २ बळी घेता आले.

MATCH UPDATE :

  • मुंबईचा चेन्नईवर १० गडी राखून विजय.
  • किशन ६८ तर डी कॉक ४६ धावांवर नाबाद.
  • अकरा षटकानंतर मुंबईच्या बिनबाद १०८ धावा.
  • किशनचे अर्धशतक, खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश.
  • सात षटकानंतर किशन ३७ तर डी कॉक २७ धावांवर नाबाद.
  • पाच षटकात मुंबईच्या बिनबाद ४७ धावा.
  • मुंबईच्या पहिल्या षटकात बिनबाद ८ धावा.
  • डी कॉककडून डावाचा पहिला चौकार.
  • दीपक चहरकडून चेन्नईच्या गोलंदाजीची सुरुवात.
  • मुंबईचे सलामीवीर डी कॉक आणि इशान किशन मैदानात.
  • २० षटकात चेन्नईच्या ९ बाद ११४ धावा.
  • बोल्टकडून करनचा त्रिफळा उद्ध्वस्त.
  • सॅम करनचे अर्धशतक, खेळीत ४ चौकार आणि २ षटकाराचा समावेश.
  • सॅम करन अर्धशतकाजवळ.
  • इम्नान ताहीर मैदानात.
  • चेन्नईचा आठवा गडी बाद, कुल्टर नाइलकडून शार्दुल माघारी.
  • १२ षटकानंतर चेन्नईच्या ७ बाद ६० धावा.
  • शार्दुल ठाकुर मैदानात.
  • राहुल चहरचा दुसरा बळी, चहर शून्यावर बाद.
  • दीपक चहर मैदानात.
  • राहुल चहरकडून धोनी झेलबाद.
  • चेन्नईच्या आशा मावळल्या. धोनी १६ धावांवर बाद.
  • सॅम करन फलंदाजीसाठी मैदानात.
  • आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा चेन्नईचा अर्धा संघ पॉवरप्लेमध्ये गारद.
  • चेन्नईचा पाचवा शिलेदार माघारी, बोल्टकडून जडेजा ७ धावांवर बाद.
  • पाच षटकात चेन्नईच्या ४ बाद २१ धावा.
  • रवींद्र जडेजा मैदानात.
  • फाफ डु प्लेसिस एका धावेवर बाद.
  • चेन्नईचा चौथा फलंदाज बाद, बोल्टचा दुसरा बळी.
  • २ षटकात चेन्नईच्या ३ बाद ३ धावा.
  • धोनी मैदानात.
  • रायुडू २ धावांवर तर जगदीशन शून्यावर झेलबाद.
  • बुमराहचा झंझावात, एकाच षटकात घेतले दोन बळी.
  • ट्रेंट बोल्टचे पहिले षटक निर्धाव.
  • अंबाटी रायुडू मैदानात.
  • ऋतुराज गायकवाड शुन्यावर बाद.
  • ट्रेंट बोल्ट टाकतोय मुंबईसाठी पहिले षटक.
  • चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस मैदानात.
  • नाणेफेक जिंकून मुंबई करणार गोलंदाजी.
  • नाणेफेकीसाठी धोनी-पोलार्ड मैदानात.
  • थोड्याच वेळात होणार नाणेफेक.

चेन्नई सुपर किंग्ज संघ -

फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, अंबाटी रायुडू, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, एन. जगदीशन, रवींद्र जडेजा, जोश हेजलवुड, दीपक चहर, शार्दुल ठाकुर, इम्रान ताहिर.

मुंबई इंडियन्स संघ -

क्विंटन डी कॉक(यष्टीरक्षक), कायरन पोलार्ड (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, सौरभ तिवारी, कृणाल पांड्या, नॅथन कुल्टर नाइल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

Last Updated : Oct 23, 2020, 10:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.