ETV Bharat / sports

KKR vs KXIP : रोमांचक सामन्यात केकेआरची पंजाबवर २ धावांनी मात

author img

By

Published : Oct 10, 2020, 3:04 PM IST

Updated : Oct 10, 2020, 8:03 PM IST

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात कोलकाताने पंजाबला २ धावांनी पराभूत केले.

IPL 2020 KXIP vs KKR Match Live Score at Abu Dhabi
KKR vs KXIP : रोमांचक सामन्यात केकेआरची पंजाबवर २ धावांनी मात

अबुधाबी - शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात कोलकाताने पंजाबला २ धावांनी पराभूत केले. कर्णधार केएल राहुल (७४) व मयांक अग्रवाल (५६) यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावत दिलेल्या शतकी सलामीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. पण केकेआरच्या गोलंदाजांनी अखेरच्या तीन षटकात टिच्चून मारा करत सामना जिंकला. पंजाबला शेवटच्या चेंडूवर सामना सुपर ओव्हरमध्ये नेण्यासाठी षटकाराची गरज होती, मॅक्सवेलने चेंडू टोलावलाही पण तो चेंडू अवघ्या एका इंचाने सीमा रेषेजवळ पडला आणि त्या चेंडूवर पंजाबला केवळ चारच धावा मिळाल्या अन् केकेआर हा सामना दोन धावांनी जिंकला.

कोलकाताने विजयासाठी दिलेल्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने सावध सुरूवात केली. कर्णधार केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी पावर प्लेच्या ६ षटकात बिनबाद ४७ धावा केल्या. या दरम्यान, रसेलने डावाच्या दुसऱ्या षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर केएल राहुलचा सोपा झेल सोडला. याचा फायदा उचलत राहुलने एक बाजू पकडून अर्धशतक झळकावले. राहुल-मयांक जोडीने १४ षटकात बिनबाद ११३ धावा धावफलकावर लागल्या. १५व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने केकेआरला पहिले यश मिळवून दिले. त्याने मयांकला गिलकरवी झेलबाद केले. मयांकने ३९ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ५६ धावा केल्या.

निकोलस पूरन (१६) नरेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. १९व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने सिमरन सिंग आणि सेट फलंदाज केएल राहुलला बाद करत सामन्यात रंगत आणली. राहुलने ५८ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. यात त्याने ६ चौकार लगावले. राहुल बाद झाल्यानंतर सुनिल नरेनने अखेरच्या षटकात भेदक मारा केला. त्याने पंजाबला विजयासाठी हव्या असलेल्या १४ धावा ग्लेन मॅक्सवेलला काढू दिल्या नाहीत. अखेरच्या चेंडूवर सामना टाय होण्यासाठी ६ धावांची गरज होती. तेव्हा मॅक्सवेलने चौकार लगावला. पंजाबला १६२ धावा करता आल्या.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या केकेआरच्या डावाची सुरुवात शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी केली. मोहम्मद शमीने तिसऱ्याच षटकात एका शानदार चेंडूवर राहुल त्रिपाठीच्या दांड्या गुल केल्या. मागील सामन्यात अर्धशतक झळकवणारा राहुल आजच्या सामन्यात १० चेंडूत ४ धावाच करू शकला. पुढच्याच षटकात नितिश राणा आणि गिल यांच्यातील सावळा गोंधळ पाहायला मिळाला. गिलने शॉर्ट फाईन लेगला चेंडू टोलावला आणि नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या राणाने चोरटी धाव घेण्यासाठी क्रिज सोडली. पण, गिलचे त्याकडे लक्षच नव्हते आणि दोन्ही फलंदाज एकाच एंडला उभे राहिले. निकोलस पूरनने राणाला धावबाद करून माघारी पाठवले.

केकेआरची अवस्था ३.३ षटकात १४ धावावर २ गडी बाद अशी झाली होती. तेव्हा गिल आणि मॉर्गन यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी सावध खेळी करत १० षटकात २ बाद ६० धावा केल्या. रवि बिश्नोईला उंच मारण्याचा नादात उडालेला मॉर्गनचा झेल ग्लेन मॅक्सवेलने टिपला. मॉर्गनने २३ चेंडूत २ चौकार आणि १ षटकारासह २३ धावा केल्या. मॉर्गन आणि गिल यांनी तिसऱ्या गड्यासाठी ४९ धावांची भागिदारी केली. यानंतर कर्णधार दिनेश कार्तिक आणि गिल याने संघाला शंभरी पार करून दिली. यादरम्यान, गिलने आपले अर्धशतक पूर्ण केले.

कार्तिक आणि गिल जोडीने ४३ चेंडूत ८१ धावा जोडल्या. यादरम्यान कार्तिकने अर्धशतक झळकावले. १८व्या षटकात शुभमन गिल धावबाद झाला. त्याने ४७ चेंडूत ५ चौकारासह ५७ धावांची खेळी साकारली. यानंतर स्फोटक आंद्रे रसेलही अवघ्या ५ धावा करत बाद झाला. कार्तिक २० व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर धावबाद झाला. त्याने २९ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारासह ५८ धावा केल्या. कमिन्स ५ धावांवर नाबाद राहिला. कोलकाताने २० षटकात ६ बाद १६४ धावा केल्या. पंजाबकडून शमी, बिश्नोई आणि अर्शदीप यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.

Last Updated : Oct 10, 2020, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.