आबुधाबी - आयपीएल २०२० चा पाचवा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज खेळला जाणार आहे. आबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्याची क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. एकीकडे केकेआर विजयी सुरूवात उत्सुक आहे. तर दुसरीकडे मुंबई पहिला विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. कारण मागील सामन्यात त्यांचा चेन्नईकडून पराभव झाला होता. आयपीएल स्पर्धेच्या मागील ९ हंगामात ६ वेळा या दोन संघांनी जेतेपद पटकावले आहे. यामुळे आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. वाचा उभय संघातील हेड टू हेड आकडेवारीवर एक नजर...
- मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यात आतापर्यंत २५ सामने खेळले गेले आहेत. यातील तब्बल १९ सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे. तर केकेआरला फक्त ६ सामन्यात विजय साकारता आला आहे.
- आयपीएलच्या मागील हंगामात दोन्ही संघानी एकमेकांविरोधात एक-एक सामना जिंकला होता.
- भारताबाहेरच्या आकडेवारीत २०१४ च्या आयपीएल हंगामात आबुधाबीमध्येच केकेआरने मुंबईला ४१ धावांनी मात दिली होती. तर २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएल हंगामामध्ये मुंबई इंडियन्सने दोन सामन्यात केकेआरचा धुव्वा उडवला होता.
- मागील दहा आयपीएल सामन्यात केकेआरला मुंबई विरोधात फक्त एक विजय मिळवता आला आहे.
- खेळाडूंची कामगिरी पाहता, कोलकाता आणि मुंबई यांच्यातील सामन्यात आंद्रे रसेलने कोलकातासाठी सर्वाधिक १४६ धावा केल्या आहे. तर दुसरीकडे रोहित शर्माने मुंबईसाठी ७०८ धावा जमवल्या आहेत.
- रोहित शर्माने कोलकाता विरोधात शतकही झळकावले आहे.
मुंबई इंडियन्सचा संभाव्य संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डि कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड, कृनाल पांड्या, जेम्स पॅटिनसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रित बुमराह.
केकेआरचा संभाव्य संघ -
सुनिल नरेन, शुभमन गिल, नितीश राणा, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक (कर्णधार यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शिवम मावी, कमलेश नागरकोटी, पॅट कमिंन्स, कुलदीप यादव.