दुबई - दिल्ली कॅपिटल्स संघासमोर एक अडचण निर्माण झाली आहे. दिल्लीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा पाठीच्या दुखापतीतून अद्याप सावरू शकलेला नाही. त्यामुळे तो दिल्लीच्या आगामी दोन सामन्यामध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे.
दिल्ली संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इशांतला दुखापतीतून सावरण्यासाठी अजुन थोडा वेळ लागेल, तो अंदाजे दोन सामन्यांना मुकेल असे आम्हाला वाटते. पण आम्ही इशांतवर कोणताही दबाव टाकणार नाही, त्याला बरे होण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ देण्यात येईल. दुखापतीमधून सावरल्यानंतरच त्याला अंतिम संघात स्थान दिले जाईल.
दरम्यान, इशांत शर्मा सरावादरम्यान झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे, किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धचा सामना खेळू शकला नव्हता. या सामन्यात दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली. इशांत शर्माच्या जागेवर या सामन्यात कगिसो रबाडा व इतर गोलंदाजांनी दिल्लीची बाजू सांभाळली.
पंजाब विरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा मार्कस स्टॉयनिस हिरो ठरला. त्याने फलंदाजीदरम्यान फटकेबाजी करत दिल्लीला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. यानंतर गोलंदाजीतही त्याने कमाल केली. अखेरचे षटक टाकत त्याने पंजाबला विजयासाठी अवघ्या एका धावेची गरज असताना दोन गडी पबाद करत सामना बरोबरीत सोडवला. यानंतर सुपर ओव्हरमध्ये कगिसो रबाडाने दोन बळी घेत फक्त दोन धावा दिल्या. विजयासाठी आवश्यक असलेल्या ३ धावा दिल्लीने सहज पूर्ण केल्या आणि विजय मिळवला.
हेही वाचा - IPL 2020 : धावा कर, पण आमच्याविरुद्ध नको; मुंबई इंडियन्सकडून रायुडूला हटके शुभेच्छा
हेही वाचा - IPL २०२० : विराटची RCB दुसऱ्या तर राहुलची KXIP पहिल्या विजयासाठी सज्ज; कोण मारणार बाजी?