अबूधाबी - मागील आठवड्यात चेन्नई सुपर किंग्ज संघातील दोन खेळाडूंसह १३ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय समितीतील सदस्यलाही लागण झाल्याचे समोर आले होते. आता दिल्ली कॅपिटल्स संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दिल्ली संघाचे सहाय्यक फिजीओ यांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. याची पूष्टी दिल्ली संघाने दिली आहे.
दिल्ली संघाच्या व्यवस्थापनाकडून एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. यात त्यांनी म्हटलं की, 'रविवारी सायंकाळी सहाय्यक फिजीओंचा रिपोर्ट आला. यात ते पॉझिटिव्ह आढळले. त्यांना नियमानुसार क्वारंटाइन करण्यात आले आहे. दुबईत दाखल झाल्यानंतर घेण्यात आलेल्या दोन चाचण्यांमध्ये ते निगेटिव्ह आढळले होते, पण त्यांच्या तिसऱ्या चाचणीचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आढळला आहे.
फिजिओ आतापर्यंत, कोणताही खेळाडू किंवा फ्रेंचायझी स्टापच्या संपर्कात आलेले नाहीत. त्यांना पुढील १४ दिवस क्वारंटाइन करण्यात आले आहे. क्वारंटाइननंतर त्यांची चाचणी केली जाईल, यात ते निगेटिव्ह आले तर त्यांना दिल्लीचा संघात सामिल होता येईल, असेही दिल्ली संघाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, दीर्घ काळ प्रतीक्षा केल्यानंतर आयपीएल २०२०चे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले आहे. यात सलामीचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात १९ सप्टेंबरला अबूधाबी येथे होणार आहे. आयपीएल- १३चा हंगाम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे युएईमध्ये खेळला जात आहे.
हेही वाचा - सचिन तेंडुलकरने बनवलाय वडापाव, शेअर केले फोटो
हेही वाचा - IPL २०२० : एका क्लिकवर जाणून घ्या आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक...