ETV Bharat / sports

CSK vs RCB : चेन्नईची पराभवाची मालिका सुरूच, बंगळुरूची 37 धावांनी मात - बंगळुरू स्कॉड टुडे

आयपीएलमध्ये आजपर्यंत दोन्ही संघांमध्ये २६ सामने खेळवण्यात आले असून त्यापैकी १६ सामन्यात चेन्नईने तर, ९ सामन्यात बंगळुरूने बाजी मारली आहे. चेन्नईचा संघ आयपीएलच्या तेराव्या हंगामात संघर्ष करताना पाहायला मिळत आहे.

ipl 2020 csk vs rcb match live
CSK vs RCB LIVE
author img

By

Published : Oct 10, 2020, 6:56 PM IST

Updated : Oct 10, 2020, 11:29 PM IST

दुबई - आयपीएलमध्ये शनिवारी डबल हेडरमधील दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झाला. विराट कोहलीच्या योगदानाच्या जोरावर बंगळुरूने चेन्नईला १७० धावांचे आव्हान दिले. मात्र चेन्नई सुपर किंग्जला बंगळुरूनी १३२ धावांतच रोखले आणि ३७ धावांनी सामना खिशात टाकला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जची पराभवाची मालिका सुरूच आहे.

कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद ९० धावांच्या योगदानामुळे बंगळुरूने चेन्नईसमोर २० षटकात ४ बाद १६९ धावा केल्या. सामन्यात नाणेफेक जिंकून बंगळुरूने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर अ‌ॅरोन फिंच (२) चेन्नईचा गोलंदाज दीपक चहरसमोर निष्प्रभ ठरला. फिंच बाद झाल्यानंतर देवदत्त पडीक्कल आणि विराट कोहली यांनी संघाची धावगती वाढवली. ३३ धावांवर असताना पडीक्कलला शार्दुल ठाकुरने माघारी धाडले. पडीक्कलनंतर आलेला डिव्हिलियर्सही खाते न उघडता तंबूत परतला. शेवटच्या षटकात शिवम दुबे आणि विराटने धावा वसूल केल्या. शिवमने २ षटकार आणि एका षटकारासह नाबाद २२ तर, विराटने ५२ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ९० धावा केल्या. चेन्नईकडून शार्दुल ठाकुरने दोन तर, दीपक चहर आणि सॅम करनने प्रत्येकी एक बळी घेतला. चेन्नईने आज केदार जाधवच्या बदली एन. जगदीशनला तर, बंगळुरूने ख्रिस मॉरिसला संघात संधी दिली आहे.

चेन्नईकडून अंबाटी रायुडू आणि एन. जगदीशन यांच्या व्यतिरिक्त कोणीही दमदार कामगिरी करू शकले नाही. कर्णधार महेंद्रसिंग धोनी देखील १० धावा काढून झेलबाद झाला आणि चाहत्यांची पुन्हा निराशा झाली. चेन्नईच्या शेवटच्या पाच फलंदांजी एकुण केवळ 20 धावाच केल्या. बंगळुरूकडून ख्रिस मॉरिसने सर्वाधिक चार षटकात तीन गडी बाद केले.

LIVE UPDATE :

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ३७ धावांनी विजय.
  • चेन्नईला विजयासाठी ३६ चेंडूत ८१ धावांची गरज.
  • चेन्नईला विजयासाठी ४२ चेंडूत ९५ धावांची गरज.
  • तेरा षटकानंतर जगदीशन आणि रायुडू २५ धावांवर नाबाद.
  • चेन्नईला विजयासाठी ६० चेंडूत १२३ धावांची गरज.
  • दहा षटकानंतर चेन्नईच्या २ बाद ४७ धावा.
  • एन. जगदीशन फलंदाजीसाठी मैदानात.
  • सुंदरचा दुसरा बळी, वॉटसन १४ धावांवर माघारी.
  • चार षटकानंतर चेन्नईच्या १ बाद १९ धावा.
  • अंबाटी रायुडू मैदानात.
  • डु प्लेसिस ८ धावांवर बाद, सुंदरला मिळाला बळी
  • पहिल्या षटकात चेन्नईच्या बिनबाद ४ धावा.
  • शेन वॉटसनकडून चेन्नईचा पहिला चौकार.
  • ख्रिस मॉरिस टाकतोय डावाचे पहिले षटक.
  • चेन्नईचे सलामीवीर मैदानात.
  • २० षटकानंतर बंगळुरूच्या ४ बाद १६९ धावा.
  • विराटच्या नाबाद ९० धावा.
  • विराट कोहलीचे अर्धशतक, खेळीत ३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश.
  • पंधरा षटकानंतर बंगळुरूच्या ४ बाद ९५ धावा.
  • शिवम दुबे मैदानात.
  • वॉशिंग्टन १० धावांवर बाद, सॅम करनने घेतला बळी.
  • वॉशिंग्टन सुंदर मैदानात.
  • एबी डिव्हिलियर्स शून्यावर बाद, शार्दुलचा दुसरा बळी.
  • एबी डिव्हिलियर्स मैदानात.
  • देवदत्त पडीक्कल ३३ धावांवर झेलबाद, शार्दुल ठाकुरला मिळाली विकेट.
  • १० षटकानंतर बंगळुरूच्या १ बाद ६५ धावा.
  • सात षटकानंतर विराट १७ तर, पडीक्कल २० धावांवर नाबाद.
  • बंगळुरूच्या पाच षटकात १ बाद २५ धावा.
  • तीन षटकानंतर बंगळुरूच्या १ बाद १५ धावा.
  • विराट कोहली मैदानात.
  • अ‌ॅरोन फिंचचा त्रिफळा, दीपक चहरने फिंचला २ धावांवर धाडले माघारी.
  • देवदत्तकडून सामन्याचा पहिला चौकार.
  • पहिल्या षटकात बंगळुरूच्या बिनबाद २ धावा.
  • दीपक चहर टाकतोय चेन्नईसाठी पहिले षटक.
  • बंगळुरूचे सलामीवीर फिंच आणि पडीक्कल मैदानात.
  • नाणेफेक जिंकून विराटसेनेचा फलंदाजीचा निर्णय.
  • थोड्याच वेळात होणार नाणेफेक.

चेन्नई सुपर किंग्जची प्लेईंग XI -

फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, अंबाटी रायुडू, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार) ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकुर, दीपक चहर, कर्ण शर्मा, एन. जगदीशन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग XI -

अ‌ॅरोन फिंच, देवदत्त पडीक्कल, विराट कोहली (कर्णधार), गुरकीरत मान, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, इसुरू उडाना आणि नवदीप सैनी.

Last Updated : Oct 10, 2020, 11:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.