ETV Bharat / sports

आयपीएलमध्ये चेन्नईच्या गोलंदाजाचा लाजिरवाणा विक्रम - csk bowler embarrassing record

चेन्नईचा गोलंदाज लुंगी एनगिडीने राजस्थानविरूद्धच्या सामन्यात २०व्या षटकात ३० धावा बहाल केल्या. या धावांमुळे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे २०वे षटक टाकणारा गोलंदाज ठरला आहे.

ipl 2020 csk bowler lungi ngidi embarrassing record in ipl history
आयपीएलमध्ये चेन्नईच्या गोलंदाजाचा लाजिरवाणा विक्रम
author img

By

Published : Sep 23, 2020, 4:04 PM IST

शारजाह - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या सत्रातील चौथ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला राजस्थान रॉयल्सविरुद्ध १६धावांनी पराभव पत्करावा लागला. मंगळवारी खेळलेल्या या सामन्यात चेन्नईचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला.

एनगिडीने टाकलेल्या २०व्या षटकात ३० धावा चोपल्या गेल्या. या धावांमुळे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे २०वे षटक टाकणारा गोलंदाज ठरला आहे. या षटकात राजस्थानच्या जोफ्रा आर्चरने दे-दणादण फलंदाजी करत सर्वांची वाहवा मिळवली.

लुंगीच्या या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जोफ्राने षटकार लगावला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही जोफ्राने षटकार खेचला. तिसऱ्या चेंडूवरही जोफ्राने षटकार वसूल केला, पण हा नो बॉल असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर चौथ्या चेंडूवरही जोफ्राने षटकार खेचला. हा चेंडूही नो बॉल होता. यानंतर गोलंदाज लुंगीने आणखी चेंडू टाकला. मात्र, त्या चेंडूला पचांनी वाईड घोषित केले. त्यामुळे जोफ्राने यावेळी फक्त दोन चेंडूत २७ धावा फटकावल्याचे पाहायला मिळाले. यानंतर षटकाचा तिसरा चेंडू निर्धाव गेला आणि पुढच्या तीन चेंडूवर प्रत्येकी एक धाव राजस्थानला घेता आली.

यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यात ख्रिस जॉर्डननेही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे २०वे षटक टाकले. या षटकातही जॉर्डनने ३० धावा दिल्या. त्यामध्ये एक वाईड आणि नो बॉलचा समावेश होता.

२०१७मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंटच्या अशोक दिंडाने मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात ३० धावा दिल्या होत्या. तर, २०१८मध्ये कोलकाताच्या शिवम मावीने दिल्ली डेअरडेव्हिल्स विरूद्ध २९ धावा बहाल केल्या होत्या.

२०११मध्ये कोची टस्कर्सच्या प्रशांत परमेश्वरनने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे षटके टाकले होते. या षटकात ख्रिस गेलने प्रशांतच्या एका षटकात कोची ३७धावा कुटल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.