कोलकाता - इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) २०२० मधील हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव कोलकातामध्ये पार पडला. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस लिनवर मोठी बोली लागली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने त्याला २ कोटींच्या बोलीवर आपल्या संघात सामील करुन घेतले.
गेल्या हंगाम कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणारा लिन आता आगामी २०२० च्या १३ व्या हंगामात मुंबईकडून खेळताना दिसेल. या बोलीनंतर लिनने ट्विटर करत नवीन हंगामासाठी आपण सज्ज असल्याचं म्हटलं आहे.
-
@mipaltan ✅
— Chris Lynn (@lynny50) December 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Great City ✅
Quality Franchise ✅
Flat wicket ✅
Don’t have to play against @Jaspritbumrah93 ✅
Can’t wait for @IPL 2020
">@mipaltan ✅
— Chris Lynn (@lynny50) December 19, 2019
Great City ✅
Quality Franchise ✅
Flat wicket ✅
Don’t have to play against @Jaspritbumrah93 ✅
Can’t wait for @IPL 2020@mipaltan ✅
— Chris Lynn (@lynny50) December 19, 2019
Great City ✅
Quality Franchise ✅
Flat wicket ✅
Don’t have to play against @Jaspritbumrah93 ✅
Can’t wait for @IPL 2020
लिनने आपल्या ट्विटमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह विरुद्ध खेळावे लागणार नाही, असे गमतीनं म्हटलं आहे. जसप्रीत बुमराह आणि लीन आता मुंबई इंडियन्सचे शिलेदार बनले आहेत. १३ हंगामात बुमराह गोलंदाजीत तर लीन फलंदाजीत धम्माल करताना दिसून येईल.
हेही वाचा - IPL Auction २०२० LIVE : 'ईटीव्ही भारत'चे खास कव्हरेज, हेटमायरसाठी दिल्लीने मोजले 'इतके' कोटी
हेही वाचा - Exclusive | IPL auction : लिलावाआधी 'ईटीव्ही भारत'ची फिरकीपटू माँटी पानेसरशी खास बातचित