दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत होत आहे. कोलकाताला बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी चेन्नईविरुद्ध विजय मिळवणे अनिवार्य आहे. तर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई मात्र कोलकाताला पराभूत करून त्यांची डोकेदुखी वाढवू शकते.
चेन्नईवर दडपण नाही -
चेन्नईच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. मात्र कोलकाताला नमवून ते बाद फेरीसाठी पहिल्या सहा संघांमध्ये असणारी स्पर्धा तीव्र करू शकतात. धोनीचे नेतृत्व कोलकातासाठी डोकेदुखी ठरू शकते. याशिवाय बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेल्यामुळे चेन्नईवर दडपण नाही. फाफ डु प्लेसिस शानदार फॉर्मात आहे. सँटनरच्या समावेशामुळे चेन्नईची गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. मागील बंगळुरूविरुद्धच्या लढतीत ऋतुराज गायकवाडने नाबाद अर्धशतक झळकावात चेन्नईला विजय मिळवून दिला आहे. पण गायकवाड वगळता चेन्नईच्या आघाडीच्या फळीसह मधली फळी अपयशी ठरली आहे. त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
कोलकाताची करा किंवा मराची स्थिती -
दुसरीकडे कोलकातासाठी ही लढत 'करा किंवा मरा' अशा स्थितीतील आहे. कोलकातासाठी फलंदाजी क्रम चिंतेचा विषय ठरला आहे. तसेच राहुल त्रिपाठी, नितीश राणाला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले आहे. शुबमन गिलने मागील लढतीत अर्धशतक झळकावले होते. गोलंदाजांमध्ये पॅट कमिन्स अपयशी ठरला असला तरी फिरकीपटू वरुण चक्रवर्ती प्रभावी ठरला आहे.
- चेन्नई सुपर किंग्सचा संघ -
- महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), मुरली विजय, अंबाटी रायुडू, फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, रवींद्र जडेजा, लुंगी एनगिडी, दीपक चाहर, पीयूष चावला, इमरान ताहिर, मिचेल सँटनर, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम करन, एन जगदीसन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, ऋतुराज गायकवाड आणि कर्ण शर्मा.
- कोलकाता नाइट राइडर्सचा संघ -
- इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंह, शुबमन गिल, सिद्धेश लाड, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिंस, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वारियर, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, सुनील नरेन, निखिल नाइक, टॉम बँटन आणि टिम सिफर्ट.