ETV Bharat / sports

इंझमाम म्हणतो...या विश्वचषकात पाकिस्तानचा संघ भारताला नक्कीच पराभूत करेल

पाकिस्तान क्रिकेट संघाला विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात भारताविरुद्ध आजवर एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाहीय

author img

By

Published : May 27, 2019, 9:33 AM IST

इंझमाम म्हणतो...या विश्वचषकात पाकिस्तानचा संघ भारताला नक्कीच पराभूत करेल

कराची - आयसीसी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा ३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणार आहे. या विश्वकरंडक स्पर्धेत क्रिकेटविश्वातील पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान १६ जूनला मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफॉर्ड क्रिकेट स्टेडियमवर समोरासमोर येणार आहेत. या महत्वाच्या लढतीपूर्वी पाक क्रिकेट निवड समितीचे प्रमुख इंझमाम उल-हक यांनी या विश्वचषकस्पर्धेत आमचा संघ भारताला नक्कीच पराभूत करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

इंझमाम म्हणाला, की 'सध्याचा पाक संघ हा भारताला पराभूत करण्यासाठी पूर्णपणे सक्षम असून विश्वकरंडक स्पर्धेत भारताविरुद्ध आजवर झालेल्या ६ पराभवाची मालिका खंडित करेल असा विश्वासही त्यांने व्यक्त केलाय.' पाक क्रिकेट संघाला विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात भारताविरुद्ध आजवर एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाहीय.

असे आहेत विश्वकरंडक स्पर्धेसाठी दोन्ही देशाचे संघ

  • भारत - विराट कोहली (कर्णधार) शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.
  • पाकिस्तान - सर्फराज अहमद (कर्णधार), बाबर आजम, फखर जमान, इमाम उल हक, हॅरिस सोहेल, आसिफ अली, मोहम्मद हफीज, इमाद वसीम, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद हसनैन, शादाब खान, शोएब मलिक आणि वहाब रियाज.

Intro:Body:

Spo 02

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.