ETV Bharat / sports

आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच आर. टी. रामचंद्रन यांचे कोरोनामुळे निधन

रामचंद्रन काही दिवसांपूर्वी आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत पार्टीत गेले होते. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली. त्यांना उपचारासाठी रायपूरच्या एमएमआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारत होती. परंतु शुक्रवारी सकाळी अचानक त्याचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी आणि दोन मुलांवर सध्या रायपूरच्या एमएमआय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

author img

By

Published : Feb 5, 2021, 4:19 PM IST

आर. टी. रामचंद्रन
आर. टी. रामचंद्रन

रायपूर - आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच आर. टी. रामचंद्रन यांचे निधन झाले आहे. आज सकाळी चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर रायपूरच्या एम.एम. ई. हॉस्पिटलमध्ये १५ दिवस उपचार सुरू होते. छत्तीसगड क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यांनी आणि खेळाडूंनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भिलाई येथे कुटुंबासमवेत रामचंद्रन राहत होते.

हेही वाचा - भारताचा दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो, ''इंग्लंड भारताला हरवू शकतो''

कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर प्रथम भिलाई येथील सेक्टर ९ रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना सेक्टर ९मधून ग्रीन कॉरिडॉर बनवून रायपूरच्या एमएमआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कुटुंबावर उपचार सुरू -

रामचंद्रन काही दिवसांपूर्वी आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत पार्टीत गेले होते. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली. त्यांना उपचारासाठी रायपूरच्या एमएमआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारत होती. परंतु शुक्रवारी सकाळी अचानक त्याचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी आणि दोन मुलांवर सध्या रायपूरच्या एमएमआय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू राजेश दवे यांनी व्यक्त केले दुःख -

माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू राजेश दवे यांनी रामचंद्रन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्याने सांगितले की, रामचंद्रन हे एक चांगले खेळाडू होते. ते आंतरराष्ट्रीय पंचही झाले. त्यांचे जाणे छत्तीसगडसाठी मोठे नुकसान आहे. त्यांचे मार्गदर्शन नेहमीच क्रिकेटच्या उन्नतीसाठी होते. छत्तीसगड राज्य क्रिकेट संघटनेच्या वतीने त्यांना आदरांजली वाहिली आहे.

रामचंद्रन यांचा प्रवास -

  • आर. टी. रामचंद्रन यांनी १९९३ ते १९९८दरम्यान ४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पंच म्हणून काम पाहिले.
  • रामचंद्रन यांनी क्रिकेटपटू म्हणून रणजीचे ३४ सामने खेळले आहेत.
  • त्यांनी अनेक राष्ट्रीय स्तरावरील सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले आहे.
  • रामचंद्रन भिलाई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.