नवी दिल्ली - इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार-यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी क्रिकेटपासून लांब आहे. टीम इंडिया विश्वकरंडक स्पर्धेनंतर वेस्ट इंडीजचा दौरा आणि त्यानंतर आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुध्द मालिका खेळत आहे. या दोनही मालिकेत धोनी दिसला नाही. यावर सुरूवातीला धोनी विश्रांती घेत असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता वेगळीच शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा - कौतुकास्पद..! अपघातात गंभीर जखमी झालेल्या चाहत्याच्या मदतीला धावला हार्दिक पांड्या
विश्वकरंडक स्पर्धेनंतर धोनी निवृत्ती स्वीकारणार, अशा चर्चांना ऊत आला होता. मात्र, धोनीने अद्याप तरी निवृत्ती विषयी कोणतेही संकेत दिलेले नाही. धोनीने आपला अखेरचा सामना विश्वकरंडक स्पर्धेत खेळला. यानंतर तो मैदानावर उतरलेला नाही. यामुळे अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. यात आता, धोनीला विश्वकरंडक स्पर्धेत दुखापत झाल्याने, तो क्रिकेटपासून दूर असल्याचे असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
इंग्रजी वृत्तपत्राने, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांच्या हवालानुसार वृत्त दिले आहे. विश्वकरंडक स्पर्धेत धोनीच्या पाठिसह मनगटाला दुखापत झाली होती. या दुखापतीसोबतच धोनी विश्वकरंडक स्पर्धा खेळला. या दुखापतींच्या कारणांमुळे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुनरागमन लांबले असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - '...अन् मी सलामीवीर बनलो', वाचा सचिनची कहाणी...