मेलबर्न - ऑस्ट्रेलियाची स्टार महिला अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी दुखापतीमुळे नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचा उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना खेळू शकली नव्हती. पेरीच्या मांसपेशीमध्ये तणाव होता. यामुळे तिला या स्पर्धेला मुकावे लागले होते. दरम्यान, बुधवारी पेरीच्या हॅमस्ट्रिंगची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. याची माहिती ऑस्ट्रेलिया प्रशिक्षक मॅथ्यू मोट यांनी दिली.
एलिस पेरीला न्यूझीलंडविरुद्धच्या साखळी फेरीतील सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. यामुळे ती उर्वरित स्पर्धेत खेळू शकली नाही. मैदानाबाहेर राहून मात्र, तिनं आपल्या संघाला मार्गदर्शन केलं. बुधवारी पेरीच्या हॅमस्ट्रिंगची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली.
याविषयी प्रशिक्षक मोट म्हणाले की, 'पेरीच्या हॅमस्ट्रिंगची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. यानंतर ती आता सिडनीमध्ये आराम करणार आहे.'
पेरीला पूर्णपणे फिट होण्यासाठी ६ महिन्याचा अवधी लागणार आहे. दरम्यान, महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव करत विजेतेपद पटकावले होते.
हेही वाचा - सचिन म्हणतोय.. कोरोना म्हणजे आग, त्याला घराबाहेर पडून ऑक्सिजन देऊ नका
हेही वाचा - IPL रद्द होण्याच्या मार्गावर, ऑलिम्पिक स्थगितीनंतर लॉकडाउनमुळे दबाव वाढला