ETV Bharat / sports

आयपीएलच्या लिलावात चमकले 'हे' भारताचे युवा खेळाडू - आयपीएलच्या लिलावात भारताचे युवा खेळाडू न्यूज

कोलकातामध्ये झालेल्या या लिलावासाठी ९७१ खेळाडूंनी नोंदणी केली होती. यातील ३३२ खेळाडूंना बीसीसीआयने निवडले होते.

indian young cricketer gets big amount in ipl 2020 auction
आयपीएलच्या लिलावात चमकले 'हे' भारताचे युवा खेळाडू
author img

By

Published : Dec 20, 2019, 7:57 PM IST

नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये लिलाव होतो, तेव्हा क्रिकेट जगतातील मोठी नावे नेहमीच चर्चेत असतात. या वेळीसुद्धा ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल आणि बरेच परदेशी खेळाडू लिलावानंतर चर्चेत आहेत. एकीकडे फ्रँचायझींनी परदेशी खेळाडूंसाठी मोठी रक्कम मोजली असली तरी त्यांनी भारतीय युवा क्रिकेटपटूंकडे दुर्लक्ष केलेले नाही.

हेही वाचा - कटक वनडेपूर्वी कोहली कंपनीने घेतला ब्रेक, पाहा काय करताहेत तुमचे आवडते खेळाडू?

कोलकातामध्ये झालेल्या या लिलावासाठी ९७१ खेळाडूंनी नोंदणी केली होती. यातील ३३२ खेळाडूंना बीसीसीआयने निवडले होते. मात्र, गुरुवारी या यादीत आणखी सहा खेळाडूंची नावे समाविष्ट करण्यात आली. यामुळे ३३२ ऐवजी ३३८ खेळाडूंवर बोली लागली. त्यामध्ये भारताचे खालील युवा खेळाडू नशीबवान ठरले आहेत. -

यशस्वी जयस्वाल -

१७ वर्षाच्या यशस्वी जयस्वालने यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याने मुंबईकडून खेळताना झारंखंड विरूद्ध द्विशतक ठोकले होते. राजस्थान रॉयल्सने यशस्वीला २.४ कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले आहे.

प्रियम गर्ग -

१९ वर्षांखालील संघाचा कर्णधार प्रियम गर्गही या लिलावात मागे राहिला नाही. बेस प्राईस २० लाख असणाऱ्या प्रियमसाठी सनरायझर्स हैदराबादने १.९० कोटींची बोली लावून संघात घेतले.

वरुण चक्रवर्ती -

गेल्या लिलावात फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला ८.४० कोटींची बोली लावून पंजाबने संघात घेतले होते. मात्र, दुखापतीमुळे त्याला या हंगामात आपली छाप पाडता आली नाही. यंदाच्या लिलावात कोलकाता संघाने वरूणवर विश्वास दाखवत ४ कोटी रुपये मोजून संघात घेतले आहे.

विराट सिंह -

'विराट' या नावाने क्रिकेट जगतात फार धूमाकूळ घातला आहे. आता आणखी एक विराट आगामी आयपीएलमध्ये आपली कामगिरी दर्शविण्यास उत्सुक आहे. झारखंडकडून खेळणारा डावखुरा फलंदाज विराट सिंहला सनरायझर्स हैदराबादने १.९० कोटींची बोली लावून संघात घेतले आहे.

रवि बिश्नोई -

राजस्थानमधील जोधपूर येथील रहिवासी असलेला रवि बिश्नोईसुद्धा त्याच्या बेस प्राईसपेक्षा जास्त किंमत घेण्यात यशस्वी झाला आहे. पंजाबच्या संघाने त्याला २ कोटी रुपये मोजून संघात घेतले आहे.

कार्तिक त्यागी -

उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी बेस प्राईसपेक्षा जास्त किंमत घेण्यात यशस्वी ठरला आहे. राजस्थान रॉयल्स संघाने त्याला १.३० कोटींची बोली लावून संघात घेतले आहे.

प्रभुजोत सिमरन -

गेल्या हंगामात पंजाबकडून प्रभुजोत सिमरन सिंगलाही चांगली किंमत देण्यात आली होती. यावेळीही पंजाबने या यष्टीरक्षक फलंदाजासाठी ५५ लाख रुपये मोजले आहेत.

Intro:Body:

indian young cricketer gets big amount in ipl 2020 auction

indian young cricketer in ipl, ipl 2020 auction uncapped players news, ipl 2020 auction indian youngster news, आयपीएलच्या लिलावात भारताचे युवा खेळाडू न्यूज, आयपीएल लिलाव भारतीय युवा क्रिकेटपटू न्यूज

आयपीएलच्या लिलावात चमकले 'हे' भारताचे युवा खेळाडू

नवी दिल्ली - जेव्हा इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये लिलाव होतो तेव्हा क्रिकेट जगतातील मोठी नावे नेहमीच चर्चेत असतात. या वेळीसुद्धा ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल आणि बरेच परदेशी खेळाडू लिलावानंतर चर्चेत आहेत. एकीकडे फ्रँचायझींनी परदेशी खेळाडूंसाठी मोठी रक्कम मोजली असली तरी त्यांनी भारतीय युवा क्रिकेटपटूंकडे दुर्लक्ष केलेले नाही.

हेही वाचा - 

कोलकातामध्ये झालेल्या या लिलावासाठी ९७१ खेळाडूंनी नोंदणी केली होती. यातील ३३२ खेळाडूंना बीसीसीआयने निवडले होते. मात्र, गुरुवारी या यादीत आणखी सहा खेळाडूंची नावे समाविष्ट करण्यात आली. यामुळे ३३२ ऐवजी ३३८ खेळाडूंवर बोली लागली. त्यामध्ये भारताचे खालील युवा खेळाडू नशीबवान ठरले आहेत. - 

यशस्वी जयस्वाल - 

१७ वर्षाच्या यशस्वी जयस्वालने यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याने मुंबईकडून खेळताना झारंखंड विरूद्ध द्विशतक ठोकले होते. राजस्थान रॉयल्सने यशस्वीला २.४ कोटी रूपयांची बोली लावून संघात घेतले आहे.

प्रियम गर्ग - 

१९ वर्षांखालील संघाचा कर्णधार प्रियम गर्गही या लिलावात मागे राहिला नाही. बेस प्राईस २० लाख असणाऱ्या प्रियमसाठी सनरायझर्स हैदराबादने १.९० कोटींची बोली लावून संघात घेतले आहे.

वरुण चक्रवर्ती -

गेल्या लिलावात फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला ८.४० कोटींची बोली लावून पंजाबने संघात घेतले होते. मात्र, दुखापतीमुळे त्याला या हंगामात आपली छाप पाडता आली नाही. यंदाच्या लिलावात कोलकाता संघाने वरूणवर विश्वास दाखवत ४ कोटी रुपये मोजून संघात घेतले आहे.

विराट सिंह - 

'विराट' या नावाने क्रिकेटजगतात फार धूमाकूळ घातला आहे. आता आणखी एक विराट आगामी आयपीएलमध्ये आपली कामगिरी दर्शविण्यास उत्सुक आहे. झारखंडकडून खेळणारा डावखुरा फलंदाज विराट  सिंहला सनरायझर्स हैदराबादने १.९० कोटींची बोली लावून संघात घेतले आहे.

रवि बिश्नोई - 

राजस्थानमधील जोधपूर येथील रहिवासी असलेला रवि बिश्नोईसुद्धा त्याच्या बेस प्राईसपेक्षा जास्त किंमत घेण्यात यशस्वी झाला आहे. पंजाबच्या संघाने त्याला २ कोटी रूपये मोजून संघात घेतले आहे.

कार्तिक त्यागी - 

उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी बेस प्राईसपेक्षा जास्त किंमत घेण्यात यशस्वी ठरला आहे. राजस्थान रॉयल्स संघाने त्याला १.३० कोटींची बोली लावून संघात घेतले आहे.

प्रभुजोत सिमरन - 

गेल्या हंगामात पंजाबकडून प्रभुजोत सिमरन सिंगलाही चांगली किंमत देण्यात आली होती. यावेळीही पंजाबने या यष्टीरक्षक फलंदाजासाठी ५५ लाख रुपये मोजले आहेत.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.