लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात भगव्या जर्सीत उतरला होता. त्या सामन्यात स्पर्धेत अजेय असलेल्या भारतीय संघाला ३१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ट्रोलर्सनी या पराभवाचे खापर भगव्या जर्सीवर फोडले. दरम्यान, पुन्हा भारतीय संघ भगव्या जर्सीमध्ये खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे.
भारतीय संघाने बांगलादेशचा २८ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. त्यानंतर यजमान इंग्लंडनेही न्यूझीलंडचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. पहिले तीन संघ ऑस्ट्रेलिया, भारत, आणि इंग्लड असे ठरु शकतात. तर चौथा संघ नेट रनरेटच्या आधारावर न्यूझीलंड ठरु शकतो. जर असे झाल्यास भारतीय संघाचा उपांत्य सामना इंग्लडशी होईल. मागील सामन्याप्रमाणे भारतीय संघाला भगव्या जर्सीमध्ये मैदानात उतरावे लागेल.
का बदलला गेला ड्रेस -
आयसीसीने 'होम आणि अवे' संकल्पनेचा स्वीकार केला आहे. यानुसार एकाच रंगाची जर्सी दोन संघ एकाच सामन्यात घालू शकत नाहीत. त्याकारणाने एका संघाच्या जर्सीमध्ये बदल केला जातो. इंग्लंडचा संघ स्पर्धेचे यजमानपद करत असल्याने भारतीय संघाची जर्सीमध्ये बदल करण्यात आली. दरम्यान, ही जर्सीमधील बदलाची संकल्पना फुटबॉल खेळातून घेण्यात आली आहे.
भारतीय संघ गुणातालिकेत दोन नंबरवर राहिला आणि इंग्लंडचा संघ जर तीन नंबरवर कायम राहिला तर भारतीय संघ उपांत्य सामन्यात साहेबांशी 'भगव्या' रंगात भिडणार आहे.