मुंबई - २०२० मध्ये होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व उत्तर प्रदेशचा फलंदाज प्रियम गर्गच्या हाती सोपवण्यात आले आहे.
हेही वाचा - टिम पेनच्या 'त्या' निर्णयावर पाहा काय म्हणाले शशी थरूर
या संघामध्ये अंधेरीच्या मराठमोळ्या अथर्व अंकोलेकरची संघात 'एन्ट्री' झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने १९९८ मध्ये विश्वकरंडक आणि २०१४ मध्ये चॅम्पियन्स चषक स्पर्धेचे आयोजन केले होते. भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांना दोन विविध गटात जागा मिळाली आहे. न्यूझीलंड आपल्या पहिल्याच सामन्या जपानशी सामना करेल. विश्वकरंडक स्पर्धेचे भारतीय संघाने चारवेळा, ऑस्ट्रेलियाने तीन, पाकिस्तानने दोन आणि इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज यांनी प्रत्येकी एकवेळा विजेतेपद पटकावले आहे.
-
Four-time winner India announce U19 Cricket World Cup squad. Priyam Garg to lead the side. pic.twitter.com/VEIPxe2a2n
— BCCI (@BCCI) December 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Four-time winner India announce U19 Cricket World Cup squad. Priyam Garg to lead the side. pic.twitter.com/VEIPxe2a2n
— BCCI (@BCCI) December 2, 2019Four-time winner India announce U19 Cricket World Cup squad. Priyam Garg to lead the side. pic.twitter.com/VEIPxe2a2n
— BCCI (@BCCI) December 2, 2019
२०००, २००८, २०१२ आणि २०१८ मध्ये वर्ल्ड कप विजयाचा मान टीम इंडियाने पटकावला आहे.
गट -
अ गट - भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, जपान.
ब गट - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, नायजेरिया.
क गट - पाकिस्तान, बांगलादेश, झिम्बाब्वे, स्कॉटलंड.
ड गट - अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, युएई, कॅनडा.
भारताचे सामने -
१९ जानेवारी - वि. श्रीलंका.
२१ जानेवारी - वि. जपान.
२४ जानेवारी - वि. न्यूझीलंड.