नवी दिल्ली - वेस्टइंडीज विरूद्ध होणाऱ्या वनडे आणि टी-ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. बांगलादेश विरूद्ध विश्रांती दिलेल्या कर्णधार विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाले आहे. कोलकात्यात झालेल्या निवड समितीच्या बैठकी दरम्यान भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.
-
ALERT🚨: #TeamIndia for the upcoming @Paytm series against West Indies announced. #INDvWI pic.twitter.com/7RJLc4MDB1
— BCCI (@BCCI) November 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">ALERT🚨: #TeamIndia for the upcoming @Paytm series against West Indies announced. #INDvWI pic.twitter.com/7RJLc4MDB1
— BCCI (@BCCI) November 21, 2019ALERT🚨: #TeamIndia for the upcoming @Paytm series against West Indies announced. #INDvWI pic.twitter.com/7RJLc4MDB1
— BCCI (@BCCI) November 21, 2019
6 डिसेंबरपासून तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. यातील पहिला सामना मुंबई येथे खेळवला जाणार आहे. 15 डिसेंबरपासून वनडे मालिका सुरू होईल. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नई येथे होणार आहे. निवड समितीने बांगलादेश विरूद्ध खेळवलेल्या नवीन चेहऱ्यांवर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे.
हेही वाचा - 'गुलाबी कसोटीसाठी आम्ही सज्ज, तुम्ही सज्ज आहात का?' पाहा भारतीय खेळाडूंचा खास व्हिडिओ
यष्टिरक्षक ऋषभ पंतवर क्रिकेट प्रेमींकडून जोरदार टीका होत असतानाही निवड समितीने पंतचा संघात समावेश केला आहे. वनडे आणि टी-२० मालिकेसाठी यष्टिरक्षणाची जबाबदारी पंतवरच आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे दुखापतीनंतर संघात पुनरागमन झाले आहे.