ETV Bharat / sports

आयपीएल प्रेमींसाठी मोठी बातमी, 'या' महिन्यात होणार लिलाव - indian premier league 2020

दरवर्षी आयपीएल हंगामासाठी लिलाव प्रक्रिया पार पडते. यात संघाचे व्यवस्थापक लिलावामधून चांगले खेळाडू आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी उत्सुक असतात. २०२० सालच्या हंगामाला अद्याप ७ महिन्याचा अवधी आहे. मात्र,आतापासूनच व्यवस्थापकांनी संघ बळकटीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

आयपीएल प्रेमींसाठी मोठी बातमी, डिसेंबरमध्ये लिलाव प्रक्रिया
author img

By

Published : Sep 26, 2019, 5:08 PM IST

नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगचा १३ वा हंगाम एप्रिल २०२० मध्ये सुरुवात होणार असल्याचा अंदाज आहे. याला अद्याप बराच अवधी शिल्लक आहे. मात्र, या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी आयपीएल हंगामासाठी लिलाव प्रक्रिया पार पडते. यात संघाचे व्यवस्थापक लिलावामधून चांगले खेळाडू आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी उत्सुक असतात. २०२० सालच्या हंगामाला अद्याप ७ महिन्याचा अवधी आहे. मात्र,आतापासूनच व्यवस्थापकांनी संघ बळकटीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

हेही वाचा - टीम इंडिया श्रीलंका विरुध्द नव्या वर्षाची करणार सुरुवात, 'असा' आहे वेळापत्रक

मिळालेल्या सूत्रांच्या महितीनुसार, याच वर्षी डिसेंबर महिन्यात खेळाडूंचा छोटेखानी लिलाव होण्याची शक्यता आहे. यंदाच्या लिलाव प्रक्रियेमध्ये प्रत्येक संघाला अधिक ३ कोटी रुपये खर्च करता येणार आहेत. म्हणजेच आता संघांना खेळाडूंसाठी एकूण ८६ कोटी रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे.

हेही वाचा - आयसीसी टी-२० रॅकिंग : रोहित ८ व्या स्थानावर, तर कोहली-धवन टॉप-१० जवळ

दरम्यान, डिसेंबर महिन्यात जर लिलाव प्रक्रिया पार पडणार असेल तर संघाचे व्यवस्थापक लवकरच प्रत्येक संघाला, आपल्याकडील खेळाडूला रिलीज करण्यासाठी अंतिम मुदत देतील. आयपीएलमधील कमकुवत मानले जाणारे संघ या लिलावाला मोठी संधी मानत असून लिलावात चांगले खेळाडू आपल्या संघात घेण्यासाठी व्यवस्थापक रणनिती आखत आहेत.

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.