ETV Bharat / sports

Happy Birthday Rohit Sharma : एकेकाळी शाळेची फी भरण्यासाठी नव्हते पैसे, आज आहे टीम इंडियाचा 'हिटमॅन' - टीम इंडियाचा सलामीवीर

जगभरातील गोलंदाजांसाठी डोकेदुखी असलेला टीम इंडियाचा सलामीवीर आणि मुंबईकर रोहित शर्मा आज आपल्या वयाची ३३ वर्ष पूर्ण करतो आहे.

Indian cricket's Rohit Sharma Happy Birthday
Happy Birthday Rohit Sharma : एकेकाळी शाळेची फी भरण्यासाठी नव्हते पैसे, आज आहे टीम इंडियाचा 'हिटमॅन'
author img

By

Published : Apr 30, 2020, 9:33 AM IST

Updated : Apr 30, 2020, 9:42 AM IST

मुंबई - जगभरातील गोलंदाजांसाठी डोकेदुखी असलेला टीम इंडियाचा सलामीवीर आणि मुंबईकर रोहित शर्मा आज आपल्या वयाची ३३ वर्ष पूर्ण करतो आहे. रोहितने त्याच्या धडाकेबाज शैलीच्या जोरावर क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. मुंबईकरांना सचिननंतर रोहित शर्मा आवडीचा खेळाडू आहे. अशा हरहुन्नरी खेळाडूकडे एकेकाळी शाळेची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. ही बाब अनेक लोकांना कदाचित माहित नसेल.

रोहितचा जन्म ३० एप्रिल १९८७ साली नागपूरमध्ये झाला. घरची परिस्थिती बेताचीच. वडील गुरुनाथ शर्मा एका खाजगी संस्थेचे केअर टेकर तर आई पोर्णिमा हाउसवाईफ होती. रोहित जेव्हा दीड वर्षाचा झाला. तेव्हा गुरूनाथ शर्मा कुटुंबासह डोंबिवलीला आले. रोहितच्या लहान भावाचे नाव विशाल असे आहे. वडील गुरूनाथ दोन मुलांचा साभाळ करु शकत नसल्याने, रोहितचे बालपण त्यांच्या अंकलकडेच झाले. रोहित अधून-मधून आई-वडीलांना भेटण्यासाठी जात असे.

रोहितला लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड. हलाकीची परिस्थिती असल्याने, त्याला शाळेची फीसुद्धा भरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागे. अशा परिस्थितीतही रोहितचे क्रिकेटप्रती प्रेम कमी झाले नाही. तो तासंनतास क्रिकेट खेळत असे. तसेच क्रिकेट विषयावर तो त्याच्या अंकलशी चर्चा करत असे. रोहितची क्रिकेटप्रती आवड पाहून अंकल आणि त्यांच्या मित्रांनी काही पैसै गोळा करुन रोहितला एका क्रिकेट अ‌ॅकडमीमध्ये घातले.

रोहित सुरूवातीला ऑफ स्पिनर गोलंदाज म्हणून संघात खेळत होता. एका क्रिकेट स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहितची प्रतिभा ओळखली. त्यांनी रोहितला स्वामी विवेकानंद शाळेत येण्यास सांगितले. सुरूवातीला रोहितच्या मनात जावं की नाही हा प्रश्न होता. कारण त्या शाळेची फी जास्त होती. पण लाड यांनी रोहितला चार वर्षांची स्कॉलरशीप देऊ केली.

दिनेश लाड यांनी रोहितला फलंदाजीचा सराव करण्यास सांगितलं. यानंतर रोहितने सलामीवीरच्या भूमिकेत खेळताना इंटर स्कूलमध्ये नाबाद १२० धावांची ताबडतोड खेळी केली. यानंतर रोहित फलंदाज म्हणून ओळखला जाऊ लागला. याच पट्ट्याने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियात सलामीवीर म्हणून आपली जागा पक्की केली आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजावर तुटून पडत आक्रमक फटकेबाजी करणारा रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'हिटमॅन' नावाने ओळखला जातो.

हेही वाचा - छोट्या भावाच्या बंदीवर कामरान अकमलने दिली प्रतिक्रिया

हेही वाचा - 'इरफान यांच्या ''त्या'' वेदना मी समजू शकतो..', युवराज भावुक

Last Updated : Apr 30, 2020, 9:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.