नवी दिल्ली - टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या कुटुंबात आता अजून दोन पाहुण्यांची भर पडली आहे. धवनने दोन भटक्या कुत्र्यांना पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या कुत्र्यांसोबतचा फोटो धवनने सोशल मीडियावर शेअर केला.
''आज या दोघांना दत्तक घेतले. क्लो आणि व्हॅलेंटाईन आमच्या कुटुंबातील दोन नवीन सदस्य आहेत'', असे धवनने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले. या फोटोत धवन या दोघांच्याही पाठीवर हात फिरवताना दिसून येत आहे, तर दुसर्या फोटोमध्ये धवनचा मुलगा झोरावरसुद्धा त्यांच्याबरोबर मस्ती करताना दिसत आहे.
-
Adopted these cuties today ❤️ Chloe and Valentine our new family members 🐕🐕 #desidogs pic.twitter.com/gk9gr37jBO
— Shikhar Dhawan (@SDhawan25) June 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Adopted these cuties today ❤️ Chloe and Valentine our new family members 🐕🐕 #desidogs pic.twitter.com/gk9gr37jBO
— Shikhar Dhawan (@SDhawan25) June 26, 2020Adopted these cuties today ❤️ Chloe and Valentine our new family members 🐕🐕 #desidogs pic.twitter.com/gk9gr37jBO
— Shikhar Dhawan (@SDhawan25) June 26, 2020
कोरोनामुळे मार्चच्या मध्यापासून क्रिकेट बंद आहे. त्यामुळे शिखर धवनसह अनेक खेळाडू आपल्या घरीच आहेत. तीन महिन्यांच्या कालावधीत धवन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह झाला होता. लॉकडाऊनमध्ये आता सरकारने थोडी सवलत दिल्याने खेळाडू सराव करण्यास परतले आहेत. या वर्षाच्या अखेरीस भारत ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणार आहे. येथे उभय संघ चार सामन्यांची कसोटी मालिका खेळतील.