मुंबई - भारताचा क्रिकेटपटू रिषी धवनच्या घरी एका पाहुण्याचे आगमन झाले आहे. रिषी धवनला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. रिषी धवनच्या पत्नीने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. रिषीने ही गोड बातमी सोशल मीडियावरून सांगितली. त्याने मुलगा व पत्नीसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
रिषी धवनने २०१६ मध्ये ३ एकदिवसीय आणि एक टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. हिमाचल प्रदेशकडून तो स्थानिक क्रिकेटमध्ये खेळतो. धवनने ७९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३ हजार ७०२ धावा आणि ३०८ विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये ९६ सामन्यांत त्याच्या नावावर १२५ विकेट्स आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
आयपीएलमध्ये त्याने किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. रिषीची पत्नी दिपाली ही फॅशन डिझाईनर आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रिषी धवनला लॉकडाऊनमध्ये घराबाहेर फिरताना पोलिसांनी पकडले होते. त्याला या प्रकरणात पोलिसांनी ५०० रुपयांचा दंडही ठोठावला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - ईद मुबारक..! सचिनसह अनेक क्रिकेटपटूंनी दिल्या शुभेच्छा
हेही वाचा - नजीकच्या काळात भारत कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करणार नाही - रिजिजू