मुंबई - चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू शिलेदार केदार जाधव आयपीएलच्या प्ले ऑफ सामन्यांना मुकणार आहे. परिणामी चेन्नईच्या संघासाठी हा मोठा धक्का आहे. मोहाली येथे झालेल्या पंजाबविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना केदारच्या खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला मैदानही सोडावे लागले होते.
इंग्लंड येथे ३० मे पासून सुरू होणाऱ्या आयसीसी विश्वचषकासाठी भारतीय संघात केदारची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या चिंतेत वाढ झालीय. कारण विश्वचषकासाठी भारतीय संघ 22 तारखेला इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. त्यापूर्वी केदार जाधवला पूर्णपणे तंदुरुस्त व्हावे लागणार आहे.