नवी दिल्ली - भारतीय महिला संघाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात आफ्रिकेवर ८ गडी राखून सहज विजय मिळवला. आफ्रिकेने दिलेले १६४ धावांचे आव्हान भारतीय संघाने ४१. ४ षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. प्रिया पुनिया आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने ३ सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
-
India Women Won by 8 Wicket(s) @Paytm #INDWvsSAW Scorecard:https://t.co/u3A4ZF86EB
— BCCI Women (@BCCIWomen) October 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">India Women Won by 8 Wicket(s) @Paytm #INDWvsSAW Scorecard:https://t.co/u3A4ZF86EB
— BCCI Women (@BCCIWomen) October 9, 2019India Women Won by 8 Wicket(s) @Paytm #INDWvsSAW Scorecard:https://t.co/u3A4ZF86EB
— BCCI Women (@BCCIWomen) October 9, 2019
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फसला. आफ्रिकेची सलामीवीर ली भोपळाही न फोडता परतली. झुलन गोस्वामीने तिला बाद केले. संघाची धावसंख्या ३२ असताना दीप्ती शर्माने त्रिशाला बाद करुन दुसरा धक्का दिला. त्यानतंर लॉरा वोल्व्हार्ट (३९) आणि मॅरीझन्ने कॅप्प (५४) वगळता आफ्रिकेच्या अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही आणि आफ्रिकेचा डाव ४५.१ षटकात १६४ धावांवर संपुष्टात आला. भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने तीन गडी टिपले. तर त्याला शिखा पांडे ( २/३८), एकता बिस्त (२/२८) आणि पूनम यादव (२/३३) यांची उत्तम साथ लाभली.
आफ्रिकेच्या १६४ धावांचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी अर्धशतकी सलामी दिली. भारताला पहिला धक्का जेमिमा रॉडिग्जच्या रुपाने बसला. जेमिमाने व्यक्तिगत ५५ धावांची खेळी केली. तर स्मृती मानधनाच्या ठिकाणी संधी मिळालेल्या प्रिया पुनियाने अर्धशतक झळकावले. संघाची धावांची १२८ असताना पूनम राऊत १६ धावांवर बाद झाली. यानंतर प्रिया आणि मिताली राज यांनी कोणतेही नुकसान न होऊ देता संघाला विजय मिळवून दिला. प्रिया (७५) आणि मिताली (११) धावांवर नाबाद राहिल्या. पहिलाच आंतरराष्ट्रीय सामन्यात १२४ चेंडूंत ८ चौकारांसह नाबाद ७५ धावांची खेळी करणाऱ्या प्रिया पुनियाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
हेही वाचा - धडाकेबाज..! महिलांमध्ये असा विक्रम करणारी मिताली जगातील एकमेव खेळाडू
हेही वाचा - सावधान इंडिया! गहुंजेची खेळपट्टी करू शकते घातपात, वाचा काय सांगतो इतिहास