मुंबई - इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल वॉनने भारत-इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेबाबत भविष्यवाणी केली आहे. उभय संघातील मालिका भारत ३-० ने जिंकेल, असे वॉन याने म्हटलं आहे.
भारताविरूद्धच्या मालिकेसाठी, इंग्लंड संघात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि जो रुट नाहीत. यामुळे इंग्लंडचा पराभव होईल, असे भाकित वॉन याने वर्तवले आहे.
मायकल वॉन याने या संदर्भात एक ट्विट केले आहे. एकदिवसीय मालिकेआधी भविष्यवाणी... भारतीय संघ ३-० ने विजयी होईल.... कारण रुट आणि आर्चर नाहीत, अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे.
-
Early One day series prediction .... India will win 3-0 !!! No Root or Archer ... #INDvENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 22, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Early One day series prediction .... India will win 3-0 !!! No Root or Archer ... #INDvENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 22, 2021Early One day series prediction .... India will win 3-0 !!! No Root or Archer ... #INDvENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 22, 2021
दरम्यान, जोफ्रा आर्चरला दुखापत झाली आहे. यामुळे त्याचा समावेश इंग्लंड संघात करण्यात आलेला नाही. तो उपचारासाठी इंग्लंडला परतला आहे. दुसरीकडे जो रुटला इंग्लंड संघात स्थान देण्यात आलेले नाही.
इंग्लंड संघाने भारतीय दौऱ्याची सुरूवात कसोटी मालिकेने केली. यात त्यांचा ३-१ ने पराभव झाला. यानंतर उभय संघात टी-२० मालिका पार पडली. भारताने या मालिकेत ३-२ ने विजय मिळवला. आता उभय संघात एकदिवसीय मालिका होत असून यात देखील भारतीय संघ विजय मिळवेल, असे वॉनने म्हटलं आहे.
भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.
इंग्लंडचा संघ -
इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, जॉस बटलर, सॅम बिलिंग्स, मोईन अली, सॅम करन, टॉम करन, आदिल रशीद आणि मार्क वूड.
हेही वाचा - इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे भारताचे टॉप-३ फलंदाज, पहिला तर आहे खास
हेही वाचा - Ind vs Eng ODI Series : भारत-इंग्लंड १०० वेळा आमनेसामने, कोण ठरलं वरचढ