अँटिग्वा - अॅशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरने टाकलेला बाऊन्सर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव स्मिथच्या मानेला लागला. यात त्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला तिसऱ्या कसोटीला मुकावे लागले. पण वेस्ट इंडीज संघाविरुध्द होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीने अजब विधान केले. तो म्हणतो, 'मी फलंदाजीला गेल्यानंतर लगेचच मला बाऊन्सर टाकला जावा.'
-
Special: @imVkohli in conversation with @ivivianrichards (Part 1)
— BCCI (@BCCI) August 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
King Kohli turns anchor and quizzes the Caribbean Master to understand his fearless mindset - by @28anand
Full interview 🎥 - https://t.co/HHGvlzfFEi pic.twitter.com/ikl7oifKSi
">Special: @imVkohli in conversation with @ivivianrichards (Part 1)
— BCCI (@BCCI) August 22, 2019
King Kohli turns anchor and quizzes the Caribbean Master to understand his fearless mindset - by @28anand
Full interview 🎥 - https://t.co/HHGvlzfFEi pic.twitter.com/ikl7oifKSiSpecial: @imVkohli in conversation with @ivivianrichards (Part 1)
— BCCI (@BCCI) August 22, 2019
King Kohli turns anchor and quizzes the Caribbean Master to understand his fearless mindset - by @28anand
Full interview 🎥 - https://t.co/HHGvlzfFEi pic.twitter.com/ikl7oifKSi
दरम्यान, वेस्ट इंडीज विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहीलीने वेस्ट इंडीजचे माजी महान खेळाडू सर विवियन रिचडर्स यांची खास मुलाखात घेतली. यावेळी रिचडर्स यांनी कोहलीच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. तसेच त्यांनी आपण कधीच हेल्मेट का घातले नाही, याचाही खुलासा केला. या मुलाखतीनंतर विराटने बाऊन्सरचे अजब विधान केले.
बाऊन्सर विषयी कोहली म्हणाला, मी जेव्हा मैदानात फलंदाजीसाठी उतरतो. तेव्हा जर गोलंदाजाने मला बाऊन्सर टाकला तर मी अधिक इर्षेने फलंदाजी करतो. त्यामुळे मला आल्याबरोबरच गोलंदाजाने बाऊन्सर टाकलेला आवडते.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फिल ह्यूजचा २०१४ साली डोक्याला चेंडू लागून मृत्यू झाला होता. ही घटना ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर शेफिल्ड शिल्ड सामन्यात घडली होती.