हैदराबाद - भारत आणि वेस्ट इंडीज संघातील ३ सामन्याची टी-२० मालिकेला ६ डिसेंबरला सुरुवात होणार आहे. पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्याआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीने पत्रकरांशी वार्तालाप केला.
यावेळी बोलताना विराट म्हणाला, 'पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्व करंडक स्पर्धेच्या दृष्टीने या मालिकेत युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे.'
पत्रकारांनी विराटला पहिल्या टी-२० सामन्यात फॉर्ममध्ये नसलेल्या ऋषभ पंतला पुन्हा संधी देणार का, असे विचारले असता. विराटने त्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यामुळे पुन्हा एकदा संजू सॅमसनला संधी मिळणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहेत.
बांगलादेश दौऱ्यातही संजू सॅमसनची निवड झाली होती. मात्र त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. तर, दुसरीकडे सतत आऊट ऑफ फार्म असलेल्या ऋषभ पंतला वारंवार संधी देण्यात आली. त्यामुळे हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. तरी, पुन्हा एकदा त्याला संधी देणार असल्याचे विराटने संकेत दिले आहेत.
हेही वाचा - INDvsWI: भारत-वेस्ट इंडीज संघात कोण ठरलं 'भारी', वाचा काय आहे इतिहास
हेही वाचा - India vs West Indies : वेस्ट इंडीजला थोपविण्यासाठी भारतीय संघाची 'पळापळ', पाहा व्हिडिओ
हेही वाचा - गोलंदाज की जादूगर...! सेलिब्रेशन दरम्यान, खिशातील रुमालाने बनवली छडी, पाहा व्हिडिओ