किंग्स्टन - भारताने दिलेल्या ४६८ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना विंडीजने दुसऱ्या डावामध्ये ४५ धावांत दोन फलंदाज गमावले आहेत. त्यामुळे चौथ्या दिवसात विंडीजच्या उरलेल्या सर्व फलंदाजांना माघारी पाठवून विजय मिळवण्यास भारतीय संघ उत्सुक असणार आहे.
हेही वाचा - इरफानने केले बुमराहचे स्वागत..!
जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विंडीजचा पहिला डाव ११७ धावांवर आटोपला होता. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाने आपला दुसरा डाव ४ बाद १६८ धावांवर घोषित करुन वेस्ट इंडिजला विजयासाठी आव्हान दिले. त्यामध्ये अजिंक्य रहाणे ६४ आणि हनुमा विहारी ५३ धावांची खेळी करत १११ धावांची भागीदारी केली.
सलामी फलंदाज मयंक अग्रवाल आणि लोकेश राहुल या डावात चांगली कामगीरी करू शकले नाहीत. चेतेश्वर पुजाराने २७ धावा केल्या. तो होल्डरच्या चेंडुवर ब्रूक्सच्या हातात अलगद झेल देत बाद झाला. कर्णधार विराट कोहलीसाठी तीसरा दिवस खराब राहिला. विराटला पहिल्याच चेंडुवर केमार रोचने बाद केले. दुसरा डाव खेळण्यासाठी मैदानात आलेल्या विंडीजच्या सलामीवीरांना इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने तंबूत धाडले.