किंग्स्टन - पहिल्या कसोटीत शानदार विजय संपादन केल्यानंतर टीम इंडिया शेवटच्या कसोटी सामन्यासाठी परत एकदा मैदानात उतरणार आहे. आज शुक्रवारी वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात सबीना पार्क मैदानावर हा सामना रंगणार असून भारताला ही मालिका २-० ने जिंकण्याची संधी असणार आहे. सामना संध्याकाळी ८ वाजता सुरु होईल.
अँटिगा कसोटीत भारताने ३१८ धावांनी विजय मिळवत टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. या कसोटीत भारताने फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह याने ७ धावात ५ तर इशांतने पहिल्या डावात ५ गडी बाद केले होते. दुसरीकडे फलंदाजीत भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारीने दमदार प्रदर्शन केले होते.
या कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराटला मोठ्या विक्रमांची संधी असणार आहे. हा सामना कोहलीने जिंकला तर तो भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार बनू शकतो. शिवाय, एक शतक करत तो पाँटिंग आणि स्मिथ यांना पिछाडीवर टाकू शकतो. पाँटिंग आणि कोहलीने कर्णधार म्हणून १९ कसोटी शतक केले आहेत.
दोन्ही संघ -
भारत : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अगरवाल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, उमेश यादव.
वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, जॉन कॅम्पबेल, शाई होप (यष्टीरक्षक), डॅरेन ब्राव्हो, रॉस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जहमार हॅमिल्टन (यष्टीरक्षक), रहकीम कॉर्नवॉल, शॅनन गॅब्रियल, केमार रोच, किमो पॉल, शमार ब्रूक्स