ETV Bharat / sports

अर्धशतकी खेळी करुन रोहित शर्माने कर्णधार कोहलीचा मोडला विश्वविक्रम - Virat Kohli

आंतराष्ट्रीय टी-२० सामन्यात सर्वाधिक ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावांची खेळी करण्याचा मान भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावे होता. हा एक विश्वविक्रम असून कोहलीचा हा रेकार्ड रोहित शर्माने मोडीत काढला आहे. रोहित शर्माने २१ व्यांदा आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये खेळताना ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावांची खेळी केली आहे.

अर्धशतकी खेळी करुन रोहित शर्माने कर्णधार कोहलीचा मोडला विश्वविक्रम
author img

By

Published : Aug 5, 2019, 1:14 PM IST

फ्लोरिडा - दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा डकवर्थ लुईस नियमानुसार २२ धावांनी पराभव करत सामन्यासह मालिकाही जिंकली. या सामन्यात हिरो ठरला भारताचा सलामीवीर रोहित शर्मा. रोहितने सामन्यात ५१ चेंडूत ६७ धावांची ताबडतोड खेळी केली. या खेळीबरोबरच त्याने एक खास विश्वविक्रमही केला आहे.

आंतराष्ट्रीय टी-२० सामन्यात सर्वाधिक ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावांची खेळी करण्याचा मान भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावे होता. हा एक विश्वविक्रम असून कोहलीचा हा रेकार्ड रोहित शर्माने मोडीत काढला आहे. रोहित शर्माने २१ व्यांदा आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये खेळताना ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावांची खेळी केली आहे.

रोहित शर्माने विराट कोहलीच्या या विक्रमाची बरोबरी मागे केली होती. त्यानंतर आता वेस्ट इंडिजच्या दौऱयात अर्धशतक ठोकत कर्णधार कोहलीचा हा विक्रम मोडत विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. रोहित शर्माने टी-२० चे ९६ सामने खेळताना २१ वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. तर कोहलीने ६९ सामने खेळताना २० वेळा हि किमया साधली आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावांची खेळी करणारे टॉप - ५ खेळाडू -

  • रोहित शर्मा ९६ सामन्यात २१ वेळा
  • विराट कोहली ६९ सामन्यात २० वेळा
  • मार्टिन गुप्टिल ७६ सामन्यात १६ वेळा
  • ख्रिस गेल ५८ सामन्यात १५ वेळा
  • ब्रॅडन मॅक्युलम ७१ सामन्यात १५ वेळा

Intro:Body:

spo 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.