ETV Bharat / sports

१५० किलोमीटरच्या वेगाने नवदीप 'तुफानी' गोलंदाजी करू शकतो; कोहलीची सैनीवर स्तुतीसुमने

author img

By

Published : Aug 4, 2019, 5:10 PM IST

Updated : Aug 4, 2019, 7:26 PM IST

कोहली म्हणाला, संपूर्ण सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व होते. या सामन्यात सैनीने चांगली गोलंदाजी केली. त्याच्याकडे वेग आणि अचूकता आहे. यामुळे तो १५० किलोमीटरच्या वेगाने गोलंदाजी करु शकतो. तसेच तो तंदुरुस्त खेळाडू आहे.

१५० किलोमीटरच्या वेगाने नवदीप 'तुफानी' गोलंदाजी करु शकतो; कोहलीची सैनीवर स्तुतीसुमने

फ्लोरिडा - आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये प्रदार्पणाच्या सामन्यातच तीन गडी बाद करून भारतीय संघाच्या विजयात नवदीप सैनीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या या कामगिरीमुळे भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात विजय मिळवत टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. सामना संपल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने 'सामनावीर' सैनीचे कौतुक केले.

कोहली म्हणाला, संपूर्ण सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व होते. या सामन्यात सैनीने चांगली गोलंदाजी केली. त्याच्याकडे वेग आणि अचूकता आहे. यामुळे तो १५० किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने गोलंदाजी करु शकतो. तसेच तो तंदुरुस्त खेळाडू आहे.

याविषयी बोलताना कोहली पुढे म्हणाला, सैनी दिल्लीचा खेळाडू असून तो खूप मोठा गोलंदाज होऊ शकतो. त्याच्यामध्ये विकेट घेण्याची भूक आहे. यामुळे तो पुढेही अशीच कामगिरी करेल, असा विश्वास कोहलीने बोलून दाखवला.

विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघ पहिल्याच परदेश दौऱ्यासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यातील टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर चार गडी राखून विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. विजयी सामन्यात सैनीने ४ षटके गोलंदाजी करत १७ धावा देत ३ गडी बाद केले.

Intro:Body:

sports

Conclusion:
Last Updated : Aug 4, 2019, 7:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.