मुंबई - वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चहरला दुखापत झाली आहे. यामुळे तो निर्णायक सामना खेळू शकणार नाही. दरम्यान, निर्णायक सामन्यासाठी दीपकच्या ठिकाणी नवदीप सैनीचा समावेश संघात करण्यात आला आहे.
बीसीसीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीपक चहरच्या कमरेला दुखापत झाली. यामुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमकडून दीपक चहरच्या कमरेवर उपचार सुरू आहेत.
![India vs West Indies: Deepak Chahar Ruled Out Of 3rd ODI, Navdeep Saini Named Replacement](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4103057_lamcq7fc_navdeep-saini-india-t20i-4103057_afp_625x300_05_august_19.jpg)
भारत आणि वेस्ट इंडीज संघात तिसरा आणि निर्णायक सामना २२ डिसेंबरला कटकच्या मैदानात खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी उभय संघात सुरू असलेल्या मालिकेत दोनही संघ १-१ ने बरोबरीत आहेत.
हैदराबाद येथील पहिला सामना विंडीजने ८ गडी राखून जिंकला. तर विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आलेला दुसरा सामना भारतीय संघाने १०७ धावांनी जिंकत बरोबरी साधली.
हेही वाचा - रोहित शर्माचे कारकिर्दीतील २८ वे शतक, मोडले अनेक रेकॉर्ड
हेही वाचा - विराट कोहली तब्बल ७ वर्षांनी ठरला 'गोल्डन डक'