ETV Bharat / sports

फखर, बाबरला धाडले तंबूत; चायनामन कुलदीप यादवचे मोक्याच्या क्षणी बळी - Vijay Shankar

भारतासाठी डोकेदुखी ठरू पाहणाऱ्या फखर जमान आणि बाबर आजम या जोडीला चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने तंबूत धाडले.

कुलदीप यादव
author img

By

Published : Jun 16, 2019, 11:36 PM IST

मँचेस्टर - भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेला सामना पुन्हा एकदा पावसाच्या व्यत्ययामुळे थांबला आहे. ३५ षटकात पाकिस्तानच्या १६६ धावा झाल्या असून त्यांचे ६ गडी बाद झाले आहेत. पाकिस्तानला अजून ९० चेंडूत १७१ धावांची गरज आहे.

भारतासाठी डोकेदुखी ठरू पाहणाऱ्या फखर जमान आणि बाबर आजम या जोडीला चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने तंबूत धाडले. पाकिस्तानचा पहिला गडी १३ धावांवर बाद झाल्यानंतर फखर आणि बाबर या जोडीने संयमी खेळ करत भारतीय गोलंदाजांना झुलवत ठेवले. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागिदारी (१०४) करत काही काळ मैदानावर जम धरला.

कर्णधार विराट कोहलीने वेगवान गोलंदाजांनंतर फिरकीचा माराही चालू ठेवला होता मात्र, ही जोडी भारतीय माऱ्याचा चांगल्या पद्धतीने सामना करत होती. मात्र, शतकी भागिदारी झालेल्या या जोडीला अखेर कुलदीपने तंबूचा रस्ता दाखवला. बाबर आजम अर्धशतकापासून केवळ दोन धावेने दूर असताना यादवच्या एका सुंदर फेकीवर तो त्रिफळाचित झाला. त्यानंतर फखरच्या साथीला मोहम्मद हाफिज मैदानात उतरला. संघाची धावसंख्या काहीशी पुढे सरकते न सरकते तोच ७५ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ६२ धावा करणाऱ्या फखर जमानला यादवने यजुवेंद्र चहलकरवी झेलबाद केले.

मोक्याच्या क्षणी यादवने पाकिस्तानचे दोन महत्त्वाचे गडी तंबूत धाडल्याने सामन्यात पुन्हा भारताने वर्चस्व मिळवले.

Intro:Body:

फखर, बाबरला धाडले तंबूत; चायनामन कुलदीप यादवचे मोक्याच्या क्षणी बळी

मँन्चेंस्टर - भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेला सामना पुन्हा एकदा पावसाच्या व्यत्ययामुळे थांबला आहे. ३५ षटकात पाकिस्तानच्या १६६ धावा झाल्या असून त्यांचे ६ गडी तंबूत दाखल झाले आहेत. पाकिस्तान अजून ९० धावांत १७१ धावांची गरज आहे.

भारतासाठी डोकेदुखी ठरू पाहणाऱ्या फखर जमान आणि बाबर आजम या जोडीला चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने तंबूत धाडले. पाकिस्तानचा पहिला गडी १३ धावांवर बाद झाल्यानंतर फखर आणि बाबर या जोडीने संयमी खेळ करत भारतीय गोलंदाजांना झुलवत ठेवले. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागिदारी (१०४) करत काही काळ मैदानावर जम धरला. कर्णधार विराट कोहलीने वेगवान गोलंदाजांनंतर फिरकीचा माराही चालू ठेवला होता मात्र, ही जोडी भारतीय माऱ्याचा चांगल्या पद्धतीने सामना करत होती. मात्र, शतकी भागिदारी झालेल्या या जोडीला अखेर कुलदीपने तंबूचा रस्ता दाखवला. बाबर आजम अर्धशतकापासून केवळ दोन धावेने दूर असताना यादवच्या एका सुंदर फेकीवर तो त्रिफळाचित झाला. त्यानंतर फखरच्या साथीला मोहम्मद हाफिज मैदानात उतरला. संघाची धावसंख्या काहीशी पुढे सरकते न सरकते तोच ७५ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ६२ धावा करणाऱ्या फखर जमानला यादवने यजुवेंद्र चहलकरवी झेलबाद केले.

मोक्याच्या क्षणी यादवने पाकिस्तानचे दोन महत्त्वाचे गडी तंबूत धाडल्याने सामन्यात पुन्हा भारताने वर्चस्व मिळवले.   

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.