रत्नागिरी - इंग्लडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेटचा कुंभमेळा म्हणजेच वर्ल्डकपमध्ये आज हाय व्होल्टेज सामना होणार आहे. तो म्हणजे भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये. या वर्ल्डकपचा फिवर सध्या क्रिकेटवेड्या प्रत्येक भारतीयाच्या मनात भिनलाय. पण त्यात भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे युद्धच. या सामन्यात भारत जिंकावा असं प्रत्येक भारतीय क्रिकेट फॅनला वाटतंय. त्यामुळे आजच्या सामन्याचा उत्साह रत्नागिरीत पण पहायला मिळाला.
रत्नागिरीतल्या छोट्या क्रिकेट चाहत्यांनी हेल्मेट, ग्लोज आणि पॅड घालून भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन देण्यासाठी घोषणा दिल्या.पण आजच्या मँचवर पावसाचे सावट आहे. त्यामुळे या सामन्यात भारत जिंकावा आणि पावसाचे सावट दूर करण्यासाठी कोकणातल्या क्रिकेट चाहत्यांनी खास कोकणी भाषेत देवाला गाऱ्हाणं घातलंय.