ETV Bharat / sports

WC IND VS PAK : विराटसेनेकडून पाकवर सर्जिकल स्ट्राईक! भारताचा ८९ धावांनी विजय - ICC Cricket World Cup 2019

आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आजवर ६ वेळा आमने-सामने आले आहेत. यात सर्वच्या सर्व म्हणजे ६ वेळा भारतीय संघाने विजय मिळवला आहे. या सामन्यात विजय मिळवून भारताने आपली आघाडी ७-० ने अशी कायम ठेवली आहे.

विजयाचा जल्लोष करताना भारताचा संघ
author img

By

Published : Jun 16, 2019, 2:43 PM IST

Updated : Jun 17, 2019, 12:58 AM IST

मॅनचेस्टर - विश्वचषकात पाकिस्तानची भारताकडून होणाऱ्या 'धुलाई'ची परंपरा या स्पर्धेतही कायम राहिली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलींच्या बॅटने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३३६ धावा केल्या. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग पाकिस्तानच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे नियमानुसार पाकिस्तानला ४० षटकांमध्ये ३०२ धावांचे आव्हान देण्यात आले. पण ढेपाळलेल्या पाकिस्तानला भारताचे आव्हान पेलवले नाही. डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळविला.

रोहित शर्माच्या १४० धावांच्या शतकी आणि कर्णधार विराट कोहलीच्या ७७ धावांच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी ३३७ धावांचे आव्हान दिले. पाकिस्तानकडून मोहम्मद आमीरने सर्वाधिक ३ विकेट घेतल्य. तर हसन अली आणि वहाब रियाझ यांना १-१ विकेट घेण्यात यश आले.

मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीला पाचारण केले होते. यानंतर भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने दमदार फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी रचली.

भारतीय संघातील विजय शंकर, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २-२ बळी घेत पाक संघाला कमकुवत केले.

आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आजवर ६ वेळा आमने-सामने आले आहेत. यात सर्वच्या सर्व म्हणजे ६ वेळा भारतीय संघाने विजय मिळवला आहे. या सामन्यात विजय मिळवून भारताने आपली आघाडी ७-० ने अशी कायम ठेवली आहे. या सामन्यात भारताकडून जायबंदी शिखर धवनच्या जागी विजय शंकरला स्थान देण्यात आले आहे.

आजच्या सामन्यासाठी अशी होती दोन्ही संघाची प्लेईंग XI

  • भारत - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, विजय शंकर, एमएस धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजेंद्र चहल, जसप्रीत बुमराह
  • पाकिस्तान - सरफराज अहमद (कर्णधार आणि यष्टिरक्षक), इमाम-उल-हक, फखार जामन, बाबर आझम, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, इमाद वासीम, शदाब खान, हसन अली, वहाब रियाज, मोहम्मद अमीर.

Intro:Body:

Spo 02

Conclusion:
Last Updated : Jun 17, 2019, 12:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.