माउंट माउंगनुई - भारताने पाच टी-२० सामन्याच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात न्यूजीलंडचा ७ धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने मालिका ५-० ने आपल्या खिशात घातली. या मालिकेत भारताने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यावर दमदार कामगिरी केली. दरम्यान, अंतिम सामन्यात भारताच्या संजू सॅमसनने सीमा रेषेवर केलेली अफलातून फिल्डिंग सद्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
भारताच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था ३ बाद १७ अशी झाली. तेव्हा अनुभवी रॉस टेलर आणि टीम सेफर्ट यांनी दमदार फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. टेलरने ८ व्या षटकात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर मिड विकेटच्या दिशने चेंडू टोलावला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार, हे जवळपास नक्की होते. पण संजूने धावत येत हवेत उडी मारली आणि चेंडू पकडला. पण, त्याला आपला तोल सावरता आला नाही. त्याने सीमारेषेच्या बाहेर पडण्याआधी चेंडू आत टाकला.
-
Whata a save 👌🤝
— ᴊᴇʙɪɴ ᴍᴀᴛʜᴇᴡ (@Im_JEBIN) February 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Sanju Samson 👏@IamSanjuSamson#SanjuSamson #NZvIND #TeamIndia pic.twitter.com/w4aEVD4dJY
">Whata a save 👌🤝
— ᴊᴇʙɪɴ ᴍᴀᴛʜᴇᴡ (@Im_JEBIN) February 2, 2020
Sanju Samson 👏@IamSanjuSamson#SanjuSamson #NZvIND #TeamIndia pic.twitter.com/w4aEVD4dJYWhata a save 👌🤝
— ᴊᴇʙɪɴ ᴍᴀᴛʜᴇᴡ (@Im_JEBIN) February 2, 2020
Sanju Samson 👏@IamSanjuSamson#SanjuSamson #NZvIND #TeamIndia pic.twitter.com/w4aEVD4dJY
रॉस टेलरला त्या चेंडूवर सहा धावा मिळणार होत्या. तिथे संजूच्या भन्नाट फिल्डिंगमुळे टेलरला फक्त दोन धावांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, भारताने हा सामना ७ धावांनी जिंकला. संजूला या सामन्यात सलामीवीर म्हणून संधी मिळाली. पण तो अपयशी ठरला. त्याला अवघ्या २ धावा काढत्या आल्या. मात्र, त्याने फिल्डिंगच्या जोरावर क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली.
हेही वाचा - IND vs NZ : न्यूझीलंडला 'व्हाईट वॉश', पाचव्या टी-२० सह भारताचा ५-० ने ऐतिहासिक मालिका विजय
हेही वाचा - युवराज सिंगच्या टीम इंडियाला भरभरून शुभेच्छा.. म्हणाला, 'पार्टी तो बनती है'