चेन्नई - भारतीय संघाने दुसरा कसोटी सामना ३१७ धावांनी जिंकत चार सामन्याच्या कसोटी मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. चेन्नई येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय संघासाठी चिंतेची बातमी समोर आली.
भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलला क्षेत्ररक्षण करत असताना दुखापत झाली. त्यामुळे तो चौथ्या दिवशी क्षेत्ररणसाठीही मैदानावर उतरला नव्हता. बीसीसीआयने सोशल मीडियावर गिलच्या दुखापतीची माहिती दिली आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, 'चेन्नई कसोटीच्या तिसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना गिलच्या डाव्या हाताला दुखापत झाली. यामुळे याला स्कॅन करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.'
शुबमन गिलच्या दुखापतीवर मेडिकल टीम नजर ठेवून आहे. गिलची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु, स्कॅनचे रिपोर्ट समोर आल्यानंतर गिलच्या दुखापतीची माहिती मिळू शकेल.
दरम्यान, शुबमन गिल सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याची दुखापत गंभीर असल्यास भारतीय संघाला मोठा बसणार आहे. गिल दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटी सामन्यास खेळला नाही तर मयांक अगरवाल याला रोहित शर्मासोबत सलामीला संधी मिळू शकते. पण असे असले तरी गिल याला दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेसा वेळही उपलब्ध आहे.
हेही वाचा - पराभवाचा वचपा..! भारताचा इंग्लंडवर ३१७ धावांनी दणदणीत विजय
हेही वाचा - WTC : टीम इंडियाची दुसऱ्या स्थानावर झेप, इंग्लंडची मोठी घसरण